|
अ.क्रि. १ पेटणें ; अग्निसंयोगानें दग्ध होणें . २ ज्वाला येणें , निघणें ; प्रज्वलित होणें ( आग , दिवा ). रात्रीस चारी प्रहर दिवा जळत होता . ३ होरपळणें ; करपणें ; नष्ट होणें ( कडक थंडीनें अथवा उन्हानें पीक ). ४ आग होणें ( अंगाची ); जळफळणें ; दाह होणें ( ताप , पित्त इ० च्या वेळी ). तो तापानें कसा जळतो आहे . ६ ( पत्त्यांचा खेळ ) खर्ची होणें ; निरुपयोगी होणें ( वास्तविक पत्ता टाकावयाचा असतां टाकला नाही म्हणून , किंवा मोठया पानाबरोबर , किंवा दुसर्या रंगाच्या हातांत , टाकल्यानें ). ७ ( ल . ) संतापणें ; जळफळणें ; तडफडणें ( त्वेष , राग इ० नीं ). त्याच्या अंगीं किती मस्ती जळती आहे . [ सं . ज्वल , ज्वलन , प्रा . जळण हिं . जलना ] ( वाप्र . ) जळो , जळोजळो , जळ्ळें - जाळ तें ! मरूंदे ! ( रागानें किंवा तिरस्कारानें काढलेला उद्गार ). जळोजळो तयाचा जप । व्यर्थ काय कोरडा प्रताप । नजळणें - आगीनेसुध्दां जळण्यासारखें नसणें ; अतिशय समृध्द भरपूर असणें ( पीक , पैसा , मालमत्ता ). म्ह० १ जळत घर भाडयानें कोण घेतो . २ कोरडयाबरोबर ओलें जळतें . ३ जळत भाकर खावी पळत हाटांत जावें = अतिशय जरूरीच्या वेळीं होईल तितकी घाई करणें .
|