|
वि. १ जादा ; अधिक ; वेगळा ; निराळा ; भिन्न . २वगळलेला ; अवांतर ; निराळा काढुन ठेवलेला . ' जाती खेरीज करुन .' वाडसमा ३ . २५१ . ' मला खेरीज ठेवुन बाकीच्यांस बोलवनी केली .' - शअ . १ शिवाय . ' तुज खरीज मला कोण्ही आश्रय नाहीं . २ वाचुन ; विना . मजखेरीज तूं जाऊ नको .' ३ बाहेर ; वेगळें . ' इंग्रजास तंबी करुन खुष्कींतुन त्याजला खरीज कारावें .' - रा १० . १८१ . ( क्रि० करणें ; वगळणें ) ( अर . खारिज् ) सामशब्द - ०कलम न निराळें किंवा जास्त सदर , बाब , वस्तु . ०जमा वसुल दस्त - स्त्रीपु . शेतसार्याशिवाय घेतलेल्या कर ; जादा सारा , पट्टी ; चिल्हर बाबी . ०मक्ता पु. साक्षात सरकारनें . मक्त्यानें दिलेल्या जमिनी , इजार्यानें किंवा खोतीनें दिलेल्या जमिनी किंवा जकातीं याहुन भिन्न ; रयतवारी ; खेरजी मक्तामुशार पहा . ०मिळकत स्त्री. अवांतर प्राप्ति , मिळकत फायदें ०मुशार मुशाहिरा , खेरजी मुक्ता मुशारा - पु . ( सरकारी नोकरांस दिलेल्या पगाराशिवाय ) भत्ता ; बक्षिसे इ० नैमित्तिक खर्च ( मेजवान्या , धर्मादाय इ०चा ) याच्या मुख्य बाबी - वर्षासन , रोजिनदार , धर्मादाव , खैरात , देवस्थान , तैवज , कचेरी , दफ्तर , रोशनाई , देहनगी , पोटगी , बक्षीस , शिरपाव , ऐवजास खर्च , सावकारी , हमी , बट्टा , इमारत , भोजन , कापड , तोटा , शिलकी दागिने , थटी इ०
|