Dictionaries | References

वेगळ

   
Script: Devanagari

वेगळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Popularly वेगळा, Separate &c.
Without: also except.

वेगळ     

वि.  ( काव्य ) पृथक् ‍ ; निराळा ; वेगळा पहा . - क्रिवि . १ शिवाय ; विना ; खेरीज . तिखटावेगळ भाकर न धके । - विक ७९ . २ सोडून ; वांचून . [ वेगळा ]
०चार  पु. ( व . ) एकत्र असलेलें कुटुंब विभक्त होणें . वेगळेचार पहा . वेगळणें - क्रि . १ वेगवेगळें करणें ; पृथक् ‍ पृथक् ‍ करणें ; भाग पाडणें . २ वगळणें ; गाळणें ; काढून टाकणें . [ वेगळा ] वेगळवाणें - वि . भिन्न ; वेगळें असें . म्हणोनि तें तैसें वोलणें । नव्हे सपातळ आड लावणें । केले मनचि वेगळवाणें । भोगावया । - ज्ञा ६ . ११४ . [ वेगळा + वाणा ] वेगळवेंटाळी - स्त्री . निरनिराळया पदार्थाचें एकीकरण . ना अशक्तपणें आंगिकें । वेगळवेंटाळी न टके । - ज्ञा १६ . ३०० [ वेगळी + वेटाळी ] वेगळा - वि . १ विभक्त केलेला ; अलग ; अंतरावर सारलेला - ठेवलेला ; विभिन्न . वोळषौनी करी वेगळा । - उषा २८ . १७ . २ निराळा ; विधर्मीय ; अन्य . ३ विभिन्न झालेला किंवा केलेला ; एखादी गोष्ट कमी असलेला ; न्यून असलेला . ( समासांत ) दृष्टीवेगळा ( अदृष्ट , अंध ); बुध्दीवेगळा ; ज्ञानावेगळा . ( ज्ञानातीत , निर्बुध्द ) कृपेवेगळा ; लोभावेगळा ; विद्येवेगळा . एखादी गोष्ट केली नाहीं असा . जाण्या - येण्या - बसण्या - उठण्या - वेगळा ; निराळा पहा . - क्रिवि . सोडून ; शिवाय ; खेरीज ; विना . कीं राम तुजवेगळा . एकक्षण । सर्वथा नव्हे हा भिन्न । [ सं . विगल ; दे . प्रा . वेग्गल ; गु . वेगळु ] वेगळा घालणें - निराळें काढणें ; विभक्त करणें . मजहि वृध्दपण आलें । लेकीं वेगळें घातलें । - दा ३ . ५ . ३३ . वेगळाचार - पु . वेगळा आचार ; विभक्त राहणें ; वेगळेचार पहा . [ वेगळा + आचार ] वेगळाला - वि . निरनिराळा ; पृथक् ‍ पृथक् ‍ . वेगळालें अक्षर वाचावयास सोपें . वेगळावणें - सक्रि . निराळी होणें ; बदलणें ; पालटणें . जेसू ध्यानस्तु होते वेंळां । पालटली प्रभा मुखकमळा । वेगळावली रूपलिळा । सर्वांगीची । - ख्रिपू २ . ३४ . ५ . वेगळावा - पु . ( कों . गो . ) भेद ; भिन्नता ; वेगळेपणा वेगळीक - स्त्री . १ भिन्नता ; वेगळेपणा ; पृथक्‍पणा ; वेगळेपणाची स्थिति . - ज्ञा १३ . ११२३ ; - एभा १३ . ३२२ . देव तोचि भक्त नाहीं वेगळीक । - निगा १७९ . २ विभक्तपणा ; कुटुंबांतील माणसांनीं वेगळें राहणें . ३ वरच्या दर्जाच्या माणसांना वागवितांना दाखविलेला फरक ; मानाप्रमाणें भेदभाव करणें . ४ ( क्व . ) निवडून वेगळें करणें ; वर्गीकरण ; वेगळें केलेली स्थिति . रुपये आणि मोहरा ह्यांची वेगळीक कर . वेगळीव - स्त्री . भिन्नता ; वेगळीक . जेथें सुखदुःखासी वेगळीव । आथीचना । - विपू ७ . ५५ . वेगळेचार - पु . १ विभक्तपणा ( विशेषतः कुटुंबांतील माणसांचा ); विभक्तपणाची स्थिति . तुझ्या घरीं वेगळेचार झाला ही गोष्ट खरी कां ? - निचं १४९ . वेगळें राहणें . २ असा विभक्तपणा होण्यास कारण असलेलें त्यांचें वर्तन . ३ मतें , आचारविचार , हिताहित इ० मधील भिन्नता , फरक , अंतर . ४ ( गो . ) विभक्त राहण्याचे विचार . [ वेगळा + आचार ] वेगळेपण , वेगळेपणा - नपु . भिन्नभाव ; निराळेंपण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP