Dictionaries | References

खातें

   
Script: Devanagari

खातें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाय तेन्ना काडूं येता असो बॅँकेन गिरायकाक दिल्लो ताणें सांठयिल्ल्या धनाचो हिशेब   Ex. म्हज्या खात्यांत फकत पाचशें रुपया आसात
HYPONYMY:
चालू खातें दलाल खातें डिमॅट खातें
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখাটা
bdसानरिकि
benঅ্যাকাউন্ট
gujખાતું
hinखाता
kanಖಾತೆ
kasکھاتہٕ
malഅകൌണ്ട്
marखाते
mniꯑꯦꯀꯥꯎꯅꯇ꯭
nepखाता
oriପାସବୁକ୍‌
panਖਾਤਾ
telఖాతా
urdکھاتا , اکاونٹ
noun  क्रिकेटच्या, बी खेळांत फलंदाजान काडिल्लो पयलो रन वा फलंदाजी करपी टिमी वटेंतल्यान काडिल्लो पयलो रन   Ex. खूबश्या फलंदाजानीं आपलें खातें लेगीत उगडूंक ना /सुरवातीच्या दोन ओवरां मेरेन आमच्या टिमीन खातें लेगीत उगडूंक नाशिल्लें
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখাতা
kasخاتہٕ
malഅക്കൌണ്ട്
See : विभाग

खातें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
or other silk cloth.

खातें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Department. An account. The range; province.

खातें     

 न. १ रोजकीर्दीवरुन तयार केलेला . खतावणीवर दिसणारा किंवा खतावणीवरुन काढलेला आणि केलेला हिशेब ( व्यक्तिचा किंव काम , धंदा यांत घातलेल्या भांडवलाचा ). जमाखर्चाची नोंद . २ असा स्वतंत्र हिशेब दाखविणारा कागद , वही , खतावणी ; हिशेबाची वही . ३ ( ल .) टप्पा ; पोहोंच ; आटोका ; आवांका , प्रांत ; हद्द ( सत्ता , अंमल , शासन , अंतर्भाव , यांची ). ' किल्लाचें खात्यांत मुलुक आहे .' ह गांव मुंबईखात्याखाली मोडतो .' ४ प्रांत ; कार्यक्षेत्र ; कचेरी ; काम ; प्रकरण ; कामाचाविशिष्ट भाग . जसे - बिगार - खैरात - खर्च - गांव - मुलकी - लष्करी - पैमाश - न्याय - खातें . ५ किनखाप . किंवा इतर रेशमी कापडाच्या तुकड्याभोंवती गुंडाळवयाची दोरी नाडी . ६ खतेदारांनी धारणकेलेला जमीनीचा तुकडा . ७ उदारीचा जमाखर्च ; देणें ; घेणें .' ' त्यांचें आमचें खातें आहे .' ( अर . खत्त = ओळ ; लिहिणें ; किंवा अर . खित्ता = मर्यादा ; क्षेत्र .) ( वाप्र .)
०ठेवणें   देण्याघेण्याचा व्यवहार चालु ठेवणें . सामशब्द -
०दार  पु. १ कुळ खेरीज करुन दुमाला नसणार्‍या जमीनीचा प्रत्यक्ष कबजा धारण करणारा . यांचे दोन भेद - पहिला जुन्या शतींचा म्हणजे गहाण खरेदी देणें वगैरे हक्क असणारा , दुसरा नव्या शतींचा म्हनजे सरदहु हक्क ; नसाणरा . - गांगा १३ . २ व्यापाराकडे . वाण्याकडे खातें असणारा ; व्यापार्‍याचें कूळ .
०पोतें  न. ( विकत देण्याघेण्याचा ) व्यवहार ; काम ; जमा खर्च . ( खातें = हिशेब + पोतें = पैशांची पिशवी . खजिना .)
०पोतें   होणें - १ जमा व खर्च नफा व तोटा बरोबर होणें ; तोंड मिळवणी होणें ; रमारमी होणेम ; २ मालमतीपासुन किंवा मुलांबाळांपासुन मुक्त होणें . नागवलें जाणें ( चोरांनी मालमत्ता चोरल्यानें व मृत्युनें मुलेंबाले हरण केल्यानें ).
बरोबर   होणें - १ जमा व खर्च नफा व तोटा बरोबर होणें ; तोंड मिळवणी होणें ; रमारमी होणेम ; २ मालमतीपासुन किंवा मुलांबाळांपासुन मुक्त होणें . नागवलें जाणें ( चोरांनी मालमत्ता चोरल्यानें व मृत्युनें मुलेंबाले हरण केल्यानें ).
०बाकी  स्त्री. परस्परांच्या खात्यांवरुन हिशेब होऊन देण्याघेण्याचा राहिला शेषांश ; हिशेबाच्या वहींतील अखेरची शिल्लक ( जमेकडील किंवा नांवेंकडील ).
०मिळवणी  स्त्री. ( ताळेबंद काढतांना केलेली ) खात्यांची मिळवणी ; सदर मिलवणी करण्यासाठी दाखल केलेली बाब .
०वही  स्त्री. निरनिराल्या माणसांची खाती जींत लिहुन ठेवलेलीं असतात ती वही .
०वाईक वि.  दुकानदाराकडे ज्याचें खातें आहे असा खातेदार .

खातें     

खातें ठेवणें
(पैसे, माल, इ.) देणेंघेणें सुरू करणें
व्यवहार करणें, ठेवणें, राहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP