|
न. जाफरा , काश्मीर या देशांत होणारें एक तंतुमय सुंगंधी द्रव् ; यांचा उपयोग लाडू , जिलबी इ० खाद्यपदार्थांस रंग व सुवास येण्याकरितां करतात . याला कुंकुम , अग्निशेखर , काश्मीरज , पीतक , काश्मिर , रुचिर , वर पिशुन , रक्त शठ इ० नांवें आहेत . यांचीं झाडे नेपाळ , काश्मीर इकडे होतात . हें झाड लहान असुन लागवडीनंतर दोन तीन महिन्यांनी यास फुलें येतात . यास तीन पाकळ्यां असुन आंत तंतु असतात तेंच केशर रंग तांबुस असुन तंतु लांब असले म्हणजे ते उंची प्रतीचेंकेशर होय . - वगु २ . ५७ . २ एक झाड . याचा रंगाकडे उपयोग करितात . कपिला ( सं .)
|