Dictionaries | References

१३

   { त्रयोदश, तेरा }
Script: Devanagari

१३     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तेरह, तेरह

१३     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तेरा, तेरा

१३     

Sanket Kosh | Marathi  Marathi
तेरा अवगुणा वाणीचे   
१ उपरोधिक, २ महाभयंकर, ३ मर्मभेदक, ४ वाहावलेली, ५ टवाळकी, ६ छलयुक्त, ७ वर्मास झोंबणारी, ८ कठिण, ९ गडबडीनें उच्चारलेली, १० कपटाची, ११ आशाळूपणाची, १२ संशयांत पाडणारी आणि १३ प्रतारणा करणारी.
आटु वेगु विंदाणु। आशा प्रतारणु ॥
हे संन्यसिले अवगुणु। जया वाचा ॥ ([ज्ञा. १३-२७२])
तेरा अग्नि (आयुर्वेद)   
पांच भौतिक अग्नि आणि सप्तधातूंतील सात धात्वग्नि व १ जठराग्नि. असे तेरा अग्नि मानव शरीरांत आहेत असे शास्त्रकार सांगतात. त्यांत मुख्य जठराग्नि होय.
तेरा आद्य नाटयाचार्य (नाटय अथवा कुशीलव शास्त्र)   
१ ब्रह्मा, २ शंख, ३ भरत, ४ नारद, ५ हनुमान, ६ व्यास, ७ वाल्मीकि, ८ लबकुश, ९ श्रीकृष्ण, १० अर्जुन, १११ पार्वती, १२ सरस्वती व १३ तुंबरु. (हिंदी सा. को.)
तेरा क्रांतिकारक शोध   
१ विस्तव तयार करण्याचा शोध, २ मुळाक्षरांचा शोध, ३ चक्राचा शोध (यामुळेंच वाहनें शक्य झाली), ४ छापण्याचें यंत्र, ५ बंदुकीची दारू, ६ वाफेचे यंत्र, ७ विद्युच्छक्ति, ८ अंतर्ज्वलन यंत्र - मोटार, ९ रेडिओ, १० विमान, ११ सिनेमा, १२ खतें तयार करण्याचा शोध व १३ परमाणू अस्त्र (परमाणूंच्या युगांत)
तेरा गुण (गार्हस्थ्य जीवनाचे)   
१ मनुष्यत्वाची प्राप्ति, २ सत्कुलांत जन्म, ३ ऐश्वर्य, ४ दीर्घायुष्य, ५ स्वस्थ शरीर, ६ सन्मित्र - समागम, ७ सत्पुत्र, ८ सती भार्या, ९ परमेश्वरभक्ति, १० विद्वत्ता ११ सुजनता, १२ इंद्रियनिग्रह आणि १३ सत्पात्रीं दानांत प्रीति, हे तेरा गुण पूर्व पुण्याईनें पाप्त होतात. ([सु.])
तेरा गुण (तांबूलाचे)   
१ कडसर, २ सुवासिक, ३ उष्ण, ४ मधुर, ५ खारट, ६ तुरट, ७ जंतुहारक, ८ दुर्गंधिनाशक, ९ पित्तशामक, १० कफनाशक, ११ मुखाची शोभा वाढविणारा, १२ मुखशुद्धि करणारा आणि १३ कामावासना प्रदीप्त करणारा.
तांबूलं कटुतिक्तमुष्णमधुरं क्षारं कषायान्वितम् ।
पित्तघ्नं कफनाशनं कृमिहरं दुर्गंधिनिर्नाशनम् ॥
वक्त्रस्याभरणं विशुद्धकरणं कामाग्निसंदीपनम् ।
तांबूलं सखये त्रयोदशगुणाःअ स्वर्गेऽपि ते दुर्लभाः ॥ ([सु.])
तेरा नखक्षत स्थाने   
१ कक्षा, २ कंठ, ३-४ दोन्ही गाल, ५ नाभि, ६-७ दोन्ही नितंब, ८-९ दोन्ही स्तनें, १० भग, ११-१२ दोन्ही खांदे व १३ कर्णमूल.
हीं स्थानें स्पर्श करण्यास योग्य असें कामशास्त्रांत मानलें आहे.
कक्षा कंठः कपोलं च नाभिः श्रीणी कुचौ तथा।
भगः स्कन्धौ कर्णमूले त्रयोदश नखालयाः ॥ (स्मरदीपिका)
तेरा प्रकार राज्यशासनाचे   
१ साम्राज्य, २ भौज्य, ३ स्वाराज्य, ४ वैराज्य, ५ पारमेष्ठय, ६ राज्य, ७ महाराज्य, ८ आधिपत्यमय, ९ सामन्तपर्यायी, १० जनराज्य, ११ विप्रराजा, १२ समर्थराज्य व १३ अधिराज्य, असे शासनाचे तेरा प्रकार प्राचीन काळीं होते. (वैदिकधर्म खंड १ ला)
तेरा महारथी पांडवांकडील   
१ अर्जुन, २ सात्यकि, ३ धृष्टद्युम्न, ४ घटोत्कच, ५ शिखंडी, ६ अभिमन्यु, ७ भीम, ८ नकुल, ९ सहदेव, १० युधिष्ठिर, ११ विराट, १२ उत्तर व १३ द्रुपद (भारतसावित्री)
तेरा यम नक्षत्रें   
१ अनुराधा, २ ज्येष्ठा, ३ मूळ, ४ पूर्वाषाढा, ५ उत्तराषाढा, ६ श्रवण, ७ धनिष्ठा, ८ शततारका, ९ पूर्वाभाद्रपदा, १० उत्तरभाद्रपदा, ११ रेवती, १२ आश्चिनी व १३ भरणी. ([तै. ब्रा.])
तेरा प्रकाराच्या स्त्रिया समागमास वर्ज्य   
१ स्नान न केलेली, २ व्याधिग्रस्त, ३ रजस्वला, ४ प्रतिकूल, ५ क्रुद्ध, ६ अयोग्य, ७ गर्मिणी, ८ वृद्धा, ९ वन्घ्या, १० दुराचरणी, ११ मुलें जगत नसलेली, १२ जिला रजोदर्शनच झालेंज नाहीं आणि १३ बहुप्रसवा (दहापेक्षां अधिक) (आचारेन्दु)
तेरा योग   
१ चर, २ क्रकच, ३ दग्ध, ४ मृत्युदा, ५ सिद्धि, ६ उत्पात, ७ मृत्यु, ८ काल, ९ अमृतसिद्धि, १० यमदंष्ट्र, ११ मुसल, १२ वज्र व १३ अमृत ([ज्योतिष])
तेरा वस्तु मंगल दायक   
१ शेळी, २ बैल, ३ चंदन, ४ वीणावाद्य, ५ आरसा, ६ मध, ७ तूप, ८ लोखंड, ९ तांब्याचें भांडें, १० शंख, ११ स्वर्णनाम, १२ शालग्राम व १३ गोरोचन या तेरा वस्तू मंगलदायक म्हणून घरीं असाव्यात.
तेरा विमानशास्त्राचे आचार्य (प्राचीन)   
१ भरद्वाज २ वाल्मीकि, ३ नारायण, ४ शौनक, ५ गर्ग, ६ वाचस्पति, ७ आक्रायणि, ८ धुंडीनाथ, ९ बोधानंद, १० यतीश्वर, ११ लल्ल, १२ शंख व १३ विश्वंमर
यांत भरद्वाजऋषि हे या विमानशास्त्राचे सर्व प्रथम निर्माते होत. (विमानशास्त्र प्रस्तावना)
तेरा जण शोच्य होत   
१ मित्रा क्षत्रिय, २ पडेल तें खाणारा ब्राह्मण, ३ निराकांक्षी व्यापारी, ४ आळशी शूद्र, ५ शीलहीन विद्वान्, ६ दुर्वृत्त कुलीन, ७ भ्रष्ट ब्राह्मण, ८ व्यमिचारिणी ब्राह्मणस्त्री, ९ विषयलंपट योगी, १० आपलें अन्न स्वहस्तें शिजविणारा, ११ अक्कल नसून वक्तृत्व करणारा, १२ शासनावांचून राष्ट्र आणि १३ प्रजेविषयीं वेपर्वा राज्यकर्ते.
हे तेराजण शोच्य म्हणजे कींव करण्यासारखे होत.
त्रयोदशाक्षरी मंत्र   
"श्रीराम जय राम जय जय राम"नव्हे मिथ्य वोलणें सत्यवाचा।
जपा अतंरीं मंत्र तेराक्षरांचा (करुणाष्टकें)
त्रयोदशगुणी विडा   
१ पान, २ सुपारी, ३ चुना, ४ कात, ५ लवंग, ६ वेलदोडा, ७ जायफळ, ८ जायपत्री, ९ कंकोळ, १० केशर, ११ खोबरें, १२ बदाम आणि १३ कापूर,
ह्मा तेरा जिनसा मिळून तयार केलेला विडा. ([सु.])

१३     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : तेर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP