|
वि. १ तेरा . २ तेरावा . [ सं . त्रयोदशन ] ०गुणीविडा पु. पान , सुपारी , काथ , चुना , लवंग , वेलदोडा , जायफळ , जायपत्री , केशर , बदाम , कस्तुरी , कंकोळ व खोबरे या तेरा पदार्थांनी युक्त असा विडा . त्रयोदशाक्षरी मंत्र पु . तेरा अक्षरांचा श्रीराम जयराम जयजयराम हा मंत्र . त्रयोदशा पु . मरणानंतर तेराव्या दिवशी करावयाचे मृताचे श्राद्ध ; ( विरु . ) तेरावा ; तेरावे . [ सं . त्रयोदश = तेरा + अहन = दिवस ] त्रयोदशी स्त्री . हिंदु महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील तेरावी तिथि . [ सं . ]
|