Dictionaries | References

कुत्रा

   
Script: Devanagari
See also:  कुतरा , कुतरी , कुतरें , कुत्री , कुत्रें

कुत्रा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kutrā m A dog. 2 fig. A vile, snarling, currish person. See phrases under कुत्रें.

कुत्रा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A dog. Fig. A vile, snarling, currish person.

कुत्रा     

ना.  कुत्ता , श्वान , शुनक , सारमेय ;
ना.  गोंडा घोळणारा , लांगूल चालन करणारा , वाईट , हलकट .

कुत्रा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक चतुष्पाद पाळीव प्राणी   Ex. कुत्रा चोर व परकी माणसे यांपासून घराचे रक्षण करतो.
ABILITY VERB:
भुंकणे
HYPONYMY:
कुत्री अलर्क बुलडॉग शिकारी कुत्रा कुत्रा
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
श्वान कुक्कुर
Wordnet:
asmকুকুৰ
bdसैमा
benকুকুর
gujકૂતરો
hinकुत्ता
kanನಾಯಿ
kasہوٗن
kokसुणें
malനായു്‌
mniꯍꯨꯏ
nepकुकुर
oriକୁକୁର
panਕੁੱਤਾ
tamநாய்
telకుక్క
urdکتا , سگ
noun  नर कुत्रा   Ex. त्याने कुत्रा पाळला आहे कुत्री नाही.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
श्वान कुक्कुर
Wordnet:
benকুত্তা
gujકૂતરો
kokसुणो
oriଅଣ୍ଡିରା କୁକୁର
sanश्वा
urdکتا , کُکّر , سگ

कुत्रा     

 पु. १ श्वान ; सारमेय ; कुक्कुर ; अर्व चतुष्पाद प्राण्यामध्यें कुत्रा हें मनुष्यांशी संबंध असलेले एक महत्वाचें जनावर आहे . हा माणसाळलेला प्राणी आहे . कुत्रा चोर व परकी माणसे यांपासुन घराचें रक्षण कर्तो . शिकार करण्याच्या कामीं त्याचा उपयोग होतो . २ ( ल .) वाईट , हलकट माणुस . ३ चितारू नांवाचा एक मासा . ( प्रा . कुत्त - कुत्ती ) कुत्री - स्त्री . १ शुनी ; सारमेयी : कुत्र्याची मादी . २ एक औषधी वनस्पति व तिचें वोंड , हिच्या फुलास व पानास वाईट तास येतो . काम्हींच्या मतें लोखंडी नांवाची वनस्पति . कुत्रें - न . १ कुत्रा - त्री . २ ( ल .) भांडखोर व शिवराळ माणुस . ३ राहाट थांबविण्यासाठी केलेली योजना . याला दोन पट्ट्या असतात . एक चपटी असून तिचें एक टोंक रहाटच्या विरुद्ध बाजुस खिळ्यांत भक्कम बसवितात व दुसर्‍या टोकांत बांकदार चपटी अशी लोखंडी कांब बसवितात . दुसर्‍या टोकांत बांकदार चपटी अशी लोखंडी कांव बसवितात व दुसर्‍या टोकाला मध्यें एक खांचा असतो , तो खांचा रहाटांत टाकला कीं गति बंद होते . ४ गवताचा एक प्रकार व त्यांचें फुल , तुरा , बोंड , हें वस्त्रास लागलें असतां चिकटून बसतें . ५ लहान कुसळयुक्त रानटी वनस्पतीचें बीं . ६ दार , झडप लावलें असतां उघडू नये म्हनुन अडकविण्याचें एक अडकवण ; आडसर ; चक्राचें दांरो उलट फिरू नयेत म्हणुन दात्यांत अडकविण्याचा धातूचा तुकडा . ७ ( वरील कुत्र्यांच्या साम्यावरुन ) कोपर , खांदा , मनगट , गुड्या , घोठां , कंबरेचा खवाटा यांचा सांधा . ( वाप्र .) ( कुत्रा ) कोलटेकणी बसणें -( माण .) पुढील दोन पाय उभे करुन मागें ढुंगण टेकून बसणें . ( कुत्रा ) मुडा घालून बसणे -( माण ). कुत्र्यानें भांड्यांत तोंड घालुन बसणें .
०कुत्रा   खाईना - अतिशय वाईट स्थिति येणें . कुत्रा , कुत्रें होऊन राहाणें , पडणें - आर्जंवानें , खुशामतीनें नोकरी करणें . कुत्रीं मारीत फिरणें , हिंडणें - रिकामटेकडें भटकणें . कुत्री वाफेला येणें -( माण .) कुती माजावर येणें ; संभोगोत्सुक होणें .
हाल   खाईना - अतिशय वाईट स्थिति येणें . कुत्रा , कुत्रें होऊन राहाणें , पडणें - आर्जंवानें , खुशामतीनें नोकरी करणें . कुत्रीं मारीत फिरणें , हिंडणें - रिकामटेकडें भटकणें . कुत्री वाफेला येणें -( माण .) कुती माजावर येणें ; संभोगोत्सुक होणें .
०शिवणे   ( माण .) ( बायकी ) स्त्री विटाळशी होणें . ( लहान मुलांच्या भाषेंत ). कुत्रीसारखी होणें -( व .) रोड होणें . कुत्रें आपल्या पायाला डसलें म्हणुन काय आपण त्याला डसावें ? - शिवरळ माणसाच्या तोंडीं लागू नये या अर्थी . - कुत्र्यांचे पाय मांजरावर आणि मांजराचें पाय कुत्र्यावर घालणें - भलभलत्या लटपटी करणें ( आपलें काम साधण्यासाठीं , केवळ गमतीसाठी ). - च्या मोतीनें मरणें - हालहाल होऊन मृत्यु येणे . - ला तोंडीं लावला तर डोक्यावर चढतो -( व .) हलकट मनुष्यांशी स्नेह ठेवला तर तो डोईजवळ वनतो . - ला हाड म्हटलें म्हणजे हाडुक टाकतें - निगरमट्ट , कोडग्या माणसाबद्दल योजतात . कुत्र्यासारखें फिरणें , हिंडणें - रिकामटेकडें भटकणें . म्ह० १ धर्माचें द्वरीं कुत्रें आडवें आले . २ ये रे कुत्र्या खा माझा पाय - नसतें भांडण उगाच आपल्या अंगावर ओढुन घेणें या अर्थी . ३ ( गो .) कुत्र्याक पालखेंत बैसलों तरी हाडुक देखून कुत्रें उडी मारतां = जन्मांची संवय परिस्थिती आल्यबारोबर उभी राहाते . सामाशब्द - कुत्र्याचा पाय - पु . रानतेरड्याचें फुल . - ची चार - स्त्री . एक प्रकारचें गवत . - चा झोंप - स्त्री . अत्यंत सावध झोंप . - ची वळ - वळ - स्त्री . कुत्र्यासारखी चळवळ , हालचाल . कुत्र्यांचेंकुवकुवणें - कुत्र्यांचें गुरगुरणें ; भुंकणें . - चे छत्र - न . कुत्र्याचे मत ; छत्री ; अळंवे ,- च जिणें - न . दैन्यावस्था ; हीन स्थिति ; निकृष्ट स्थिति . - चें झाड - न . एक कांटेरी झुडुप . यांचें फळ चकचकीत तांबडें व रसाळ असते . - वें तोंड - न . ( ल .) फटकळ माणुस ; निंदा करणारा , अश्लील भाषण करणारा माणुस . - चें दांत - पुअव . ( मुलांच्या भाषेंत ) दुध्या भोपळ्याच्या बिया . - चें पाय - मांजराचें पाय - पुअव . चिडविडीत अक्षर . - चे भोकभर - भोकावर - क्रिवि . कुत्र्याचें भुंकणे ऐकू जाईल एवध्या मजलीवर ( गांव इ० ). - चें मूत - १ न . कुत्र्याची छत्री ; अळंबे . २ ( ल .) एककल्ली , दुसर्‍याच्या अंगावर वस्कन येणारा , तुसडा चिरडखोर , सदा चिडचिड करणारा माणुस . म्ह० ( व .) कुत्र्यांचें मुत सड्यास ना सारवणास - चें विष - न . कुत्रा चावला असतां मनुष्य भांबावल्यासारखें करतो त्याला ज्वर येतो , डोळे व लघवी पिवळी होते . कालांतरानें उन्माद येऊन कुत्र्याप्रमाणें भुंकतो व चावतो . यावर उपायः - काळ्या उंबराचें मुळ व धोतर्‍याचें फळ ही दोन्हीं तांदुळाच्या धुवणांत वाटून पिणें . किंवा कस्तुरी व बाभळीच्या पानाचा रस गाईच्या तुपाशी घेणें अथवा शतावरीचा रस गाईच्या दूधांतून पिण्यास देणें . - योर २ . ७०८ . - चें शेपूट - चि शेपडी - नस्त्री . ( हें नेहमी वांकडें असतें , सरळ रहात नाहीं याव रून ल .) सुधारण्याचा किती हि यत्‍न केला तरी व्यर्थ जाऊन पुर्वीच्या वळणावर जाणारा , लतकोडगा , दुष्ट माणुस . म्ह० कुत्र्याचें शेपूट नळींत घातलें तरी वांकडें - मुर्खांच्या मनावर उपदेशांचा कांहिही परिणाम होत नाही , देहस्वभाव जात नाही .

कुत्रा     

कुत्रा हाल खाईना
दुर्दशा होणें
अत्‍यंत वाईट स्‍िथति येणें. (कुत्रा अतिशय घाणेरडी वस्‍तु सुद्धां खातो, पण तोहि याकडे बघेना.) कुत्रा म्‍हणजे कोणीहि माणूस या अर्थी.
कुत्रेक उजो घालुनु ल्‍हायो भाजच्यो
भाताच्या उडव्याला आग लावून त्‍यावर लाह्या भाजणें. उडव्यामध्ये खंडीच्या मापानें भात असते. लाह्या फोडण्यासाठी विस्‍तव हवा म्‍हणून ते उडवे पेटवून देणें हे महामूर्खपणाचे लक्षण होय. क्षुद्र कार्याच्या सिद्धीसाठी मोलाच्या वस्‍तूचा विध्वंस करणें या अर्थानें वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP