Dictionaries | References क कवळ Script: Devanagari See also: कवल , कवलकरार Meaning Related Words कवळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . A disorder of the bile producing jaundice. कवळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A mouthful.n f Loppings of bushes. A quantity embraced. कवळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : घास, मूठ कवळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( कों .) भातशेंतीची जमीन भाजण्यासाठीं ऐन , किंजळ , साग , बेहडा इत्यादि झाडांचे जे टाळे तोडुण ठेवतात ते . राब . ( क्रि०तोडणें ; लावणे ; भाजणें ; जाळणें ). ' कवळ तोडवयाची मजुरी असामी वीस एकून आकार पोटासुद्धा दर आणेप्रमाणे ' - मसाप २ . २ . ६५ पु. १ घास , कवल - ळ अर्थ १ पहा . ' मुखींचा कवळ मुखींजाण । माझें ध्यान लागलें । ' एभा १२ . ११२ . ' तयाचे मुखीं मिष्टान्नकवळ । ' - विउ ११ . १३३ . २ ( मुठींत घेतलेली ) वस्तु , ( हातांत मावणारा ) पदार्थ ( गवत , लाकूड ); मुठभर जिन्नस . ' कामधेनूसी शुष्क तृणकवळ । ' - रावि १ . २२ . ३ मध्यभाग ; गाभा . ' त्या मुसळाचा मध्यकवळ । चूर्ण नव्हेच अतिप्रबळ । उरला वज्रप्राय केवळ । तो समुद्रीं तत्काळ झुगारिला । ' - एभा १ . ३८१ . ४ टंचा ; ( टाचेच्या ) खालच्या भाग ; तळ . ' बालसुर्याचेनि उजाळें । तैसीं कवळें टांचाचीं '- एरुस्व १ . २१ . ५ ( कु .) औषधी झाडाचा पाला वगैरे वाटून डोकीवर घालतात तों लेप , थर पेंड . ' कांद्यांचा कवळ डोक्यावर घाल . ' ६ ( चांभार ) ( मोटेच्या ) डेर्यास सोंड जोडण्याचा सांधा . ( क्रि० काढणें = सोडचें व डेर्याचें मेज बरोबर बसणासाठीं केलेलीं कपाकाप ). ७ गो . गोळा . पु. तोंडांतील घास . ' न बळ प्रेक्षी परि यतिहस्तीचा पाहतां गळे कवळ । ' - मोकृष्णाविजय ८६ . १२ ' शिष्य श्रवणीं कवळ भरी । उद्गार वचनें । ' - दा . ५ . २ . १७ ( सं . कवल = ग्रास ; तुल . ह्रिबू . कओम्हून = अन्न ) स्त्री. मिठी . ' घालु दे केवळ बैस ये जवळ तुला मैतरणी । ' - प्रला २०८ . ( कव ) स्त्री. १ मिठी ; आलिंगन ; खेंव . ' पृथा देवी आणि सोंवळी । स्नेहें मिळाल्या खेंवकवळीं । ' - मुआदि ४५ . ११९ . ' दोघे मिसळेले केशकवळी .' ०मुविराट ३ . १४१ . २ नांगरांच्या रुमणीची खीळ ; पाचर . ( कव ) न. ( कों .) टाळें ; शिरडीं ; शिरीं . कवल - ळ . २ पहा . स्त्री. कावीळ ; कामीण . ( पित्तप्रकोपामुळें उप्तन्न होणारी ). ' कवळें अध्यासिल डोळा । तों चंद्रमा देखे पिवळा ' - एभा १० . ६३३ . ( सं . कामला )०काठी स्त्री. १ राब . २ झाडपाला ; हलक्या काट्या ; काड्या ; शिरीं शिरकाठीं वगैरे . कवल - ळ पहा . कवळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कवळ उतरणेंआईन, किंजळ वगैरे झाडाचा छाट शेतात नेऊन ठेवणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP