Dictionaries | References

अगोदर खाईल मग तोंड धुवील

   
Script: Devanagari

अगोदर खाईल मग तोंड धुवील     

एखाद्या स्वादाड मनुष्यास उठल्याबरोबर प्रथम कांहींतरी खावयास लागतें. उठल्याबरोबर प्रथम शौचमुखमार्जन करण्यापूर्वीहि अगोदर तो खाण्याची चौकशी करील आणि खाल्यानंतर मग कोणत्याहि कामासंबंधीं विचार करील. प्रथम एखादी न खाण्याजोगती वस्तु विचारपूस केल्याशिवाय अगर ती भक्ष्य आहे कीं अभक्ष्य आहे याचा विचार न करतां एखादा मनुष्य प्रथम खाऊन टाकतो आणि नतंर ती वाईट लागल्यावर किंवा अभक्ष्य आहे असें समजल्यानंतर तोंड धुऊन ट्काण्याचि स्वटपट करतो, त्यापेक्षां प्रथमच अधिक विचार करील तर ही मागाहून तोंड धुण्याची यातायात कशाला करावी लागेल? तेव्हां एखादी गोष्ट अविचारानें करून मग पश्चत्ताप पावण्यापेक्षां अगोदरच अधिक विचार केलेला चांगला नव्हे का?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP