Dictionaries | References

कन्या देऊन मग कूळ विचारणें

   
Script: Devanagari

कन्या देऊन मग कूळ विचारणें     

ज्‍या ठिकाणी कन्या द्यावयाची त्‍या गृहस्‍थाच्या जातीची, घराण्याची वगैरे चौकशी करावयाची ती अगोदर केली पाहिजे. एकदां कन्यादान करून लग्‍न लावल्‍यावर मग ही चौकशी केली तरी ती निष्‍फळ होय. कोणतेहि कार्य करावयाचे त्‍यास हात घालण्यापूर्वी नीट चौकशी करावी
नाहीतर योग्‍य वेळ निघून गेल्‍यावर केलेल्‍या चौकशीचा काही फायदा नाही. ‘कन्या देऊनियां कूळ। मग काय विचारावें।।’ -देविदास, व्यंस्‍तो. -शाब २.२२२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP