|
स्त्री. संमति ; इच्छा ; आवड ; पसंती . यजमानाचे मर्जीप्रमाणें वर्तावें . सुप्रसन्नता ; कृपा ; लोभ . आताशीं त्याजवर मर्जी आहे . स्वभाव ; तब्यत ; अंतःकरणवृत्ति त्या पुरुषाची मर्जी कठीण . [ अर . मर्झी ] म्ह० मर्जी देवाची मिथ्या धाव मनाची . ०खप्पा बारीक होणें जात राहणें - नाखूष असणें ; आवडेनासा होणें . श्रीमंत स्वामींची बहुतच मर्जी बारीक जाली आहे . - रा १ . २२८ . ०जिंकणें आपलासा करुन घेणें ; भीड , दरारा चेपणें ; भीति नाहींशी होणें ; ऊब जिंकणें पहा . मर्जीतून उतरणें , जाणें आवडेनासा होणें ; लोभ कृपा नाहींशीं होणें . ०बसणें लोभ जडणें ०मोडणें एखाद्यास अप्रिय असें कांहीं करणें ; मन मोडणें ; मर्जीविरुद्ध वागणें . ०राखणें संभाळणें - एखाद्याची कृपा , लोभ टिकवणें ; नाखूष न होईल अशा तर्हेनें वागणें . ०संपादणें कृपा , लोभ संपादणें . मर्जीस उतरणें आवडणें ; मनास येणें ; पसंत पडणें . ०अजूर आर्जू - स्त्री . इच्छा . - दिमरा १ . २२२ . ०खेरीज क्रिवि . आज्ञेबाहेर ; इच्छेबाहेर . आम्ही आजतागायत तुमच्या मर्जीखेरीज नाहीं . - दिमरा २ . १३४ . ०माफक क्रिवि . मर्जीप्रमाणें ( करणें , होणें इ० ). ०मिजाज स्त्री. प्रकृति ; तब्येत . नबाबाची मर्जीमिजाज विलक्षण जाली . - रा ३ . ४११ . ०मुबारक स्त्री. शुभेच्छा . स्वामींचे मर्जी मुबारकेंत आल्यास मी विजयदुर्गाहून पुण्यास येईन . - ऐटी १ . ६७ . ०रक्षण न. मर्जी , इच्छा , कृपा सांभाळणें . ०संपादन न. कृपा , लोभ संपादन करणें .
|