|
वि. ३२ ही संख्या ; तीस अधिक दोन . [ सं . द्वात्रिंशत ; प्रा . बत्तीस ] ०हालविणें पाडणें - दांत पाडून टाकणें . ०अक्षरी - पु . कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमोनम : । हा मंत्र . मंत्र - पु . कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमोनम : । हा मंत्र . ०गुणी लक्षणी - - वि . सर्वगुणसंपन्न ; शास्त्रांत सांगितलेल्या सर्व शुभ लक्षणांनीं युक्त . हीं लक्षणें बत्तीस आहेत . बत्तीस लक्षणी सावित्री कुवारी जन्मली । - बसा २८ . ( उप . ) अत्यंत मूर्ख ; नालायख . ०विद्या स्त्रीअव . वृक्ष , पशु , मनुष्य , संसेचन , संहरण , स्तंभन , दृति , भस्मीकरण , सांकर्य , पार्थक्य , तरी , नौ , नौका , अध्वपथ , घंटापथ , सेतु , शकुंत , विमाननयन , वास :. कुट्टी , मंदिर , प्रासाद , दुर्ग , कूट , आकार , आपण , राजगृह , आराम , देवालय , नगररचना , युद्ध इ० विद्या . - मसाप १ . २ . ६ . बत्तीस राम पळौप क्रि . ( गो . ) पुष्कळ काळ जगून पुष्कळ अनुभव घेणें .
|