Dictionaries | References

ग्रँट

   
Script: Devanagari

ग्रँट     

 स्त्री. १ परस्पर संगतवार अर्थाच्या वाक्यांचा रचनाविशिष्ट समुदाय . पोथी , पुस्तक ( गद्य किंवा पद्य यांचें ). २ ( ल . व . शब्दश : ) गुंफणी ; जुळवणी ; जोडणी ; संपादणी . ३ पुस्तक ; भाग ; अध्याय ; परिच्छेद इ० ४ बत्तीस अक्षरांचें वृत किंवा वृत्ताची ओळ . व्यासकृत महाभारत लक्षग्रंथ प्रसिध्द हा भारी । - मोआदि १ . ९ . ( एका अनुष्टुभांत ३२ अक्षरें असतात व अनुष्टुभालाहि ग्रंथ म्हणतात त्यावरून ३२ ची संख्या ). ५ ( ल . ) योजना ; बेत ; कट ; मसलत . बाळोबा आणि भाऊ हा सगळा एक ग्रंथ आहे . - अस्तंभा ९६ . ६ प्रसंग ; गोष्ट ; हकीकत ( व्यवहार इ० संबंधीं ). आमचा पूर्वापार ग्रंथ ऐकून मग न्याय करा . ७ पराचा कावळा ; एवढयाचें एवढें करणें ; विस्तार . ८ अर्थ , संगति . त्यांनीं राजीनामा कां दिला याचा ग्रंथ लावणें कठीण . - के २७ . ५ . ३० . ९ अकांडतांडव ; कुभांड . [ सं . ग्रथ = रचणें ] ( वाप्र . )
०आटोपणें   ( काम ) संपणें ; ( कार्य ) नाश होणें , ( माणूस ) मरणें . पण आमच्या दुर्दैवानें सर्वच ग्रंथ आटोपला । - भयंकरदिव्य . ग्र , ग्रंथन - न . गुंफण ; जुडण ; बांधणी ; रचना . आणि माझें तव आघवें । ग्रथन येणेंचि भावें । - ज्ञा १३ . ३२८ . [ सं . ]
०पंचक  न. ( ख्रि . ) पवित्रशास्त्रांतील पहिलीं पांच पुस्तकें . हीं मोशे यानें लिहिल्याचें मानितात . ( इं . ) पेंटयाटयूक . ग्रंथपंचकामध्यें इस्त्राएल लोकांचें नेमशास्त्र आहे .
०विस्तार  पु. ग्रंथांतील गोष्टींचा , भाषेचा विस्तार , पाल्हाळ ; मोठा ग्रंथ . सामाशब्द -
०कर्ता   कार - वि . पुस्तक तयार करणारा , रचणारा कवि ; लेखक ; संपादक . ग्र ग्रंथणें - उक्रि . ( काव्य . ) १ अर्थानुसंधानपूर्वक अनेक वाक्यें एकत्र गुंफणें , बांधणें , जुळणें , रचणें ( पद्य , कविता ) ग्रंथरचना करणें ; ग्रंथ संपादणें . जें मी संजात ग्रंथलों देख । आचार्ये कीं । - ज्ञा १८ . १७६९ . ग्रथिलें भारत ज्यानें त्यालाहि स्वमनिं सौख्य वाटेना । २ गुंफणें ; ओंवणे ( पुष्पादि ). ३ एकत्रित करणें ; जुळणें . [ सं . ग्रथन ] ग्रंथाची ग्रंथांतर टीका - स्त्री . एका पुस्तकानें दुसर्‍या पुस्तकाचें विवरण करणें . ग्रंथावरचा मालकी हक्क - पु . ( कायदा ). ग्रंथलेखकाचा त्या ग्रंथाचें पुन : प्रकाशन , भाषांतर इत्यादिसंबंधी हक्क . ( इं . ) कॉपीराईट . ग्रंथीय ग्रंथीथीस - वि . पुस्तकासंबंधीं ; पुस्तकांतील . ग्रंथोपजीवी - वि . ग्रंथ लिहून ( रचून ) पोट भरणारा . आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें - ज्ञा १८ . १८०० . [ सं . ग्रंथ + उपजीविन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP