Dictionaries | References

कडु

   
Script: Devanagari
See also:  कडू

कडु

   पु कड ; बाजू .' दक्षिणे श्रीमुकुटाचा कडु केला .' - ऋ १३५ ; - अमृ २ . ४८ . ( कांहीं प्रतींत ). ( कडे )
 वि.  १ . कडवा ( गोडाचे उलट , कडुनिंबाच्या चवीप्रमाणें ). २ बेचव ; पित्तविकारामुळें बदलणारी ( जिभेची रुचि ). ३ न रुचणारें ; अप्रिय ; कठोर ( वाक्य , भाषण इ० ). ' आधीं कडु मग गोड .' ४ ज्यास कीड लागत नाही , जें कीड खात नाहीं असें ( विशिष्ट झाड , वनस्पति ). ५ जारज संतति ( गोडच्या उलट ). ६ गोड नसणारें ; अशुदेध ( विशिष्ट तेल ). ७ कठिण , गांठ्यांळ ( बाभळीच्या लांकडाचा आंतील भाग ; नार ; वरचा भाग ठिसूळ , नरम किंवा गोड असतो ). ८ निर्दय ; कडक ; ताठर ( माणुस , स्वभाव ). ९ नापीक ; लागवदीला प्रतिकूल ( जमीन ). १० झोंबणारी ; कडक तिखट ( विशिष्ट भाजी ). - न . १ ( ल .) अफू . २ कात ( रात्रीच्या वेळेस काताचें नांव घ्यावयाचें नाहीं म्हणुन त्याबद्दल म्हणतात ) ३ मृताशोंच . कडु विटाळ या शब्दाचा संक्षेप . - स्त्री . डोळ्यांचें दुखणें ( डोळ्यांत माती गेल्यानें , जाग्रण केल्यानें येणारें ). ( क्रि येणे , उ० डोळ्यांला कडु येणें ). - पु . १ दासीपासून झालेली संतति ; अनौरस जारस सतति ; लेकवळा ( याच्या उलट गोड .) ' त्याच्या राज्यांत मल्हारराव नामक त्याच्या एका कडु सापत्‍न भावानें जें बंड माजविलें होतें ...' - हिंक ८४ . २ पाटाची संतति ( सं . कटु ; प्रा . कडु ; गु . कुडवु ; हिं कडुवा ; सिं कडो )
०इंद्रायण  न. कुंपणावारील एक वेल ; ह्याची फळें तांबडीं , विषारी व रुचीस कडू असतात ; कवंडळ ; इंद्रावण ; इंद्रवारुण ; कडूवृदांवन २ ( ल .) तुसडा . माणुघाण्या ; एकलकोंडा माणुस .
०करांदा   - पु . एक कडवट तपकिरी रंगाचा कंद .
०कारले  न. १ कारलें . २ ( ल .) वाईट स्वभावाचा व न सुधारणारा माणुस . ' तो एक कडुं कारलें आहे , त्याची संगत धरूं नको म्हणजे झाले ,' म्ह० कडू कारले तुपांत तळलें . ' साखरेंत घोळलें तरी तें कडु तें कडुच .'
०कारळी   कारळें - स्त्रीन . कारळें तीळासारखें औषधी बीं ; कडु जिरें ; काळें जिरें . याचें झाड दोन तीन हात उंच असून ह्यास थोडे येतात . व त्यांत बी असते . हें कृमिनाशक आणि वातनाशक आहे . - शे . ९ . २३४ .
०काळ  पु. वाईट दिवस ; अडचणीची स्थिति ; साथ ; दुष्कळ ; दुर्गति . ( क्रि० येणें ; असणें ; चालणें ; वाहणें ; जाणें ; टळणें ; चुकणें ; चुकविणें )
०घोसाळें  न. घोसाळ्याची एक जात . - शे . ९ . २३५ .
०जहर वि.  अतिशय कडु ; विषासरखें कडू
०जिरें   कडू कारळी पहा .
०झोंप  स्त्री. अपुरी झोंप ; झोंपमोड ; झोंपेचें खोबरें . ( क्रि०करणें ).
०तेल  न. १ करंजले , करंजाच्या बियांचें तेल . २ उंडिणीचे तेल ; ( हेट .) पुन्नागफळांचें तेल . ४ ( सामा .) न खाण्यापैकी तेल ( चोखटेल किंवा गोडे तेल याच्या उलट ).
०दोडका  पु. १ कडवट दोडका . २ दासीपुत्र ; लेकवळा . ३ ( ल .) पंक्तिबाह्म ; जातिबहिष्कृत माणुस ; कडु भोपळा पहा .
०दोडकी  स्त्री. भाद्रपद महिन्यांत फुलणारी एक वेल ; दिवाळी ; हिचीं पानें औषधीं असून , फळांस दिवाळें म्हणतात . - शे ९ . २३५ .
०निंब  पु. बाळनिंब ; बाळंतनिंब ; हा वृक्ष फार मोठा असून सर्वत्र होतो . याची पानें गुडीपाडव्याला खातत . हा अनेक व्याधींवर उपयोगी आहे . याचे लाकुंड इमारतीच्या उपयोगी आहे . आर्यवैद्यकांत याला रसायन म्हटले आहे . म्ह० १ गूळ चारणारापेक्षां निबचारणारा बरा होतो . २ ( कर्‍हेपठारी ) कडु निंबाच्या झाडाखालून उठून आला = ज्याच्या जवळ कांहीं पैसा नाहीं असा ; भणंग ; ( उपहासार्थी योजितात ).
०पडसळ  न. कडू असलेलें पडवळ . - शे . ९ . २३५ .
०पाणी  न. पाण्यांत कडुनिंबाचें किंवा निरगुडीचें टहाळे बालून उकळलेलें पाणी ( यानें आजार्‍यास , बाळंतिणीस वगैरे स्नान घालतात ). २ विटाळ सपल्यानंतर बायका ज्या पाण्यानें डोक्यावरुन स्नान करतात तें पाणी . अशा स्नानालाहि म्हणतात . ( क्रि० घेणे ). ३ मृताशौच किंवा कडूविटाळ संपल्यानंतर माणसानें स्नानार्थ घ्यावयाचें पाणी . ( येथें कडु म्हणजे दुःखदायक प्रसंगाशीं आलेला संबंध ). ( क्रि . घेणें ) ४ भाजीपाला शिजविलेलें पाणी .
०पाणी   ( बायको वाप्र .) वरील विटाळ फिट - साध्या पाण्यानें स्नान करणें किंवा अंगावर पाणी घेणें .
काढणें   ( बायको वाप्र .) वरील विटाळ फिट - साध्या पाण्यानें स्नान करणें किंवा अंगावर पाणी घेणें .
०पाला  पु. कडु पाण्यांत घालावयाचीं करंज , लिंब , निर्गुडी , जांभळी इ० ची पानें . भोपळा - पु . १ कडवट रुबीचा भोपळा ; दुध्या भोपळ्याची एक जात ( याचा उपयोग सतार , वीणा , वगैरे वाद्यांच्या कामीं व सांगड , तुंबडी इ० च्या कामीं करतात ). २ ( ल .) दासीपुत्र . ३ ( ल .) पंक्तिबाह्म ; हलक्या जातीचा ; बहिष्कृत माणुस .
०भोपळी  स्त्री. कडू भोपळ्याची वेल ; कडू भोपळा अर्थ १ पहा . - शे . ९ . २३६ .
०वट   टु - वि . ( काव्य ) कडवट पहा . ' कैलासवन कडुवट । उमावन तुरट । ' - शिशु ६१५ . ' जैसा निंब जिभे कडुवटु । ' - ज्ञा १८ . १८६ . ' कडुवट हरिनामें वाटती पापियाला । ' - वामन नामसुधा १ . ४ . ३४ .
०वाघांटी  स्त्री. कडवट फळें येणारी एक वनस्पती ; आषाढी द्वादशीस हिच्या फळांची भाजी करतात .
०विख वि.  कडजहर ; विषाप्रमाणें कडु
०विटाळ  पु. १ मृताशौच ; सुतक . २ बाळंतपणाचा विटाळ ; बाळंतिणीला येणारा दहा दिवसांचा विटाळ ; जननाशौच . ( क्रि० येणें ; जाणें ; सरणें ; फिटणें ;).
०वृदांवन  न. कडू इंद्रायण पहा . ' कडु वृदांवन । साखरेचें आळें । ' - तुगा .

Related Words

कडु   कडु खावुनु गोड खांवका   भरले पोटा उंबर कडु   असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी   पोटु दुकिल्लो कडु खातलो, चिकला आपळेलो धुवून घेतलो   कोडवॅलॉ   bifters   अडुक   कडवी जात   कडुवाळ   कडिबळपण   कोडवाळ   कंडोळ   अंबलें   कडिया   काडेचिराइत   कारिंट   कारीट   कडव   करांदा   खंवचट वचड   इंद्रायेण   खवचट   कडू पाणी   कमंडलु   कंवडल   कंवडळ   कोरफड   खाजणें   कारळें   किराईत कोडशी   शेंदणी   निंबोणी   कडू   कुटकी   खवट   इंद्राणी   कडवा   खंवट   तंबुरा   कटु   कारली   कंवठ   कटोरा   तंबोरा   bitter   काजू   कारलें   करंज   करज   कंडा   कंडू   सांकड   सांकडा   षड्रस   निंब   खाद   कुडा   कड   केळ   काळा   खंड   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1               
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP