मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
विश्वेदेव

धर्मसिंधु - विश्वेदेव

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


ज्या श्राद्धी विशेष सांगितला नसेल त्या सर्व पार्वणश्राद्धी पुरूरवार्द्रसंज्ञक विश्वेदेव घ्यावे. काम्यश्राद्ध व महालय श्राद्ध यामध्ये धूरिलोचनसंज्ञक विश्वेदेव घ्यावेत. नैमित्तिक श्राद्ध व अष्टकाख्य अष्टमी श्राद्ध यात कामकालसंज्ञक विश्वेदेव घ्यावेत. एकोद्दिष्ट किंवा सपंडीकरण श्राद्ध हे नैमित्तिक श्राद्ध होय. नांदीश्राद्धात सप्तवसुसजॅक विश्वेदेव घ्यावेत. त्यातही गर्भाधान, पुंसवन व सीमंतोन्नयन या तीन संस्कारांगभूत व अन्वाधान आणि सोमयाग यांचे अंगभूत असे नांदीश्राद्ध, इष्टिश्राद्धसंज्ञक व कर्मांगसंज्ञक नांदीश्राद्धांत क्रतुदक्षसंज्ञक विश्वेदेव घ्यावे. पितृपार्वण व मातामहपार्वण या दोन पार्वणातील पहिला म्हणजे पिता जिवंत असता मातृपार्वणयुक्तच जे नांदीश्राद्ध करावयाचे ते देवरहित करावे. याप्रमाणे निरनिराळ्या पार्वणांनी नांदीश्राद्ध कर्तव्य असता त्यातही मातृपार्वण देवहीन करावे. तीन दिवस नांदीश्राद्धात क्रमाने तीन पार्वणे करावी. एका दिवशी निरनिराळे पार्वण किंवा बरोबर तीन पार्वणे किंवा एकतंत्राने तीन पार्वणे असे तीन पक्ष आहेत. नित्य श्राद्ध करावयाचे ते देवरहित करावे. याप्रमाणे सपिंडीकरणाच्या पूर्वीची जी एकोद्दिष्टे श्राद्धे ती देवहीन करावी. याप्रमाणे श्राद्धदेवतांचा निर्णय सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP