मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
हीन याती माझी देवा । कैसी...

संत चोखामेळा - हीन याती माझी देवा । कैसी...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥

मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥

माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥

माझ्या गोविंदा गोपाळा । करुणा भाकी चोखामेळा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP