मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
वारंवार किती करुं करकर । ...

संत चोखामेळा - वारंवार किती करुं करकर । ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


वारंवार किती करुं करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥

न बोलावें आतां हेंचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥

केव्हां तरी आम्हां होईल आठव । हाचि एक भाव धरुं आतां ॥३॥

चोखा म्हणे मग येशील गिवसित । तोंवरी हें चित्त दृढ करुं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP