मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
आपुल्या आपण सांभाळोनी घ्य...

संत चोखामेळा - आपुल्या आपण सांभाळोनी घ्य...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥

वांयाचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥

अंगा नाहीं आलें तंव तें साहालें । खादलें पचलें तरी तें हित ॥३॥

चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें । माझें यांत उणें काय होतें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP