मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
नाहीं देह शुद्ध याति अमंग...

संत चोखामेळा - नाहीं देह शुद्ध याति अमंग...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


नाहीं देह शुद्ध याति अमंगळ । अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥

करुं जातां विचार अवघा अनाचार । आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥

वाणी नाहीं शुद्ध धड न ये वचन । धिःकारिती जन सर्व मज ॥३॥

अंगसंग कोणी जवळ न बैसे । चोखा म्हणे ऐसें जीवित माझें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP