मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
नीचाचे संगती देवो विटाळला...

संत चोखामेळा - नीचाचे संगती देवो विटाळला...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


नीचाचे संगती देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥

मुळींच सोंवळा कोठें तो वोवळा । पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥

सोंवळ्यांचे ठाईं सोंवळा आहे । वोवळ्या ठाईं वोवळा कां न राहे ॥३॥

चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा । तोचि म्यां देखिला दृष्‍टीभरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP