मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
उपजले विटाळीं मेले ते विट...

संत चोखामेळा - उपजले विटाळीं मेले ते विट...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


उपजले विटाळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं तेही जाती ॥१॥

रडती पडती तेही वेगे मरती । परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥

कायरे हा देह सुखाचा तयासी । उघडाचि जासी अंतकाळीं ॥३॥

चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । अंतीं यम फांसा गळां पडे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP