मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
जगामध्यें दिसे बरें कीं व...

संत चोखामेळा - जगामध्यें दिसे बरें कीं व...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


जगामध्यें दिसे बरें कीं वाईट । ऐसाचि बोभाट करीन देवा ॥१॥

आतां कोठवरी धरावी हे भीड । तुम्हीं तो उघड जाणतसां ॥२॥

ब्रीदाचा तोडर बांधलासे पायीं । त्रिभुवनीं ग्वाही तुमची आहे ॥३॥

चोखा म्हणे जेणें न ये उणेपण । तेंचि तें कारण जाणा देवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP