मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
समर्थांसी रंकें शिकवण जैश...

संत चोखामेळा - समर्थांसी रंकें शिकवण जैश...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


समर्थांसी रंकें शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड ॥१॥

शुभ हें अशुभ न कळे बोलतां । परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥

उच्छिष्‍टाची आशा भुंकतसे श्वान । तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥

चोखा म्हणे एका घासाची चाकरी । करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP