विषयसापेक्ष कविता - पक्षांची निवडणूक

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


निवडणूक पक्षांची घेवुनि ।
गुणविशेष सांगाया अपुले ।
पारावर पक्षीगण जमले ।
म्हणति पुढारी हवाच म्हणुनी ॥
पोपटपंची सुरु जाहली ।
हरितक्रान्ति अंगावरिं आली ।
असे सांगतो पोपटभय्या ।
`म्हणति पक्षिणी `खरेच अय्या' ।
केकावलिचा ये कानीं स्वर ।
मयूर पंतहि पुढतीं येती ।
निळापिसारा घेत शिरांवर ।
नृत्यकला सकलांना दाविति ।
बगळे ढवळे, पुढे धावले ।
`ध्यान समाधी, माझी चाले' ।
शुभ्रवसन व्रत पहा घेतले ।
निवड योग्य माझींच' म्हणाले ॥
तोच कावळे पुढे येवुनीं ।
म्हणे महत्व, न `पोषाखाला' ।
`घाण जगातिल नष्ट करोनी' ।
`मदत करीं आम्ही मानवतेला' ॥
टिळा पांढरा नाका वरतीं ।
येत घुमत पारवाच पुढतीं ।
राख फासुनी सर्वांगाला ।
म्हणे `बंदि हिंसाचाराला' ॥
`फट् फट्' ये आवाज कोठुनीं ।
पक्षी सर्वहि भेदरले ।
नको निवड अन् नको पुढारी ।
जीव जगविण्या, धूम पळाले ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP