विषयसापेक्ष कविता - पक्षांची देशभक्ती

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


पटांगणीं लष्कराच्या जवांनांची कवाईत ।
हातीं घेवोनी बंदूका, डावा ऊजवा चालीत ।
मिळवाया, अनुभव, लुटूपुटूची लढाई ।
भिडतातीं पलटणी, करोनीया हातघाई ।
वृक्षांवरीं जवळच्या, फांदीवरतीं हातघाई ।
पक्षीगण दृश्य पाहे, एकमेकाला पुसून ।
सर्वजमोनी घेतली, देशभक्तीची शपथ ।
``ज्यांसीं साधेल ते करा,'' आता करायाची, शर्थ ।
कबूतरे आली पुढे, करु काम जासूदांचे ।
`गुप्त बातमी घेवोनीं, वरिष्ठाला ती देण्यांचे ।
काका कावळे म्हणाले, शत्रू पेरती, सुरुंग ।
`काव काव करु तेथें, आणू जवानाला जाग' ।
आले पुढयांत काजवे छोटे चिमुकले जीव ।
म्हणे `माझ्या देशांसाठी, आम्हां आहे काय वाव ?
ठिपक्यांच्या प्रकाशांनीं, रात्रीं अंधारात दाट' ।
`लक्ष्य' खोटे गनिमाला, गोळ्या घालवू फुकट' ।
घारी, गिधाडे म्हणाली, शत्रूपक्षांच्या विमानीं ।
`धाड घालू पंख्यावर करु जिवाची कुर्बानीं ।
देशभक्तीच्या स्फुर्तीनें, भारलेले पक्षिगण ।
वाट पहात `हाकेची', स्वीकाराया ते आव्हान ।

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP