विषयसापेक्ष कविता - सांवळा केदार-नाथ

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


नको हिणवूगे बाळा, रंग केदाराचा काळा ।
शामवर्ण होता राम, कोटीं मुखामाजीं नाम ।
धनुर्भंग टणत्कार, हालविले चराचर ।
कृष्ण होता शामवर्ण, केले गोकुळां बेभान ।
गोवर्धन उचलिला, विसरला त्याच्या लिला ?
नाथ केदारही काळा, भक्ति भावाने हो भोळा ।
वर्णू कैसा पराक्रम ? हिमनगांसीं केले धाम ।
तैसा, विठ्ठल पंढरीं, लाख जमवीं, वारकरी ।
काय वदतीं त्यां काळा ? तोच पुरवी सर्वा जळां ।
तैसा होणार केदार, चोहोकडूनि ये आदर ।
शाम वर्णाची ना खंत, उद्या होईल जयवंत ।
नको बाह्यांगीं पारखू, गुण-पुंज त्याचे देखू ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP