N/A?
मोहमयीं रंगाच्या सदनीं, जन्म सागरीं घेशी ।
महिलांचा सहवास सदा तव, नाते सौदर्यासीं ॥
रंगित काया, गंध आवडे, छोटया पासुनि मोठयांस ।
शरीरयष्टी, केसासम परि, दरवळतातीं सुग्रास ॥
कुशींत बाळपणीं मातेच्या, तदनंतर तू साथी ।
निद्रा वा विश्रांती घेतां, तुझीच रे संगती ॥
छपरावरि वा जुनाट वाडे, वस्ती याची खास असे ।
घुमत रहावे राख फासुनीं, परि ना विस्तारित प्रेमातें ॥
नाव तुझे रे पुराणांतरीं, कुळकुळीत रंगानें ।
जीव चिमुकला परि बलशाली, भेंदीं खांब मुखानें ॥
रुंजि घालण्यां गुंग सदां तू, खुशाल चेंडू बनला ।
जिथे जलाशय तिथे सापडे, लक्ष्मी आसन त्याला ॥
मोती, उदबत्ती, उशी, पारवा/कबूतर, भुंगा (भृंग), भुंगा/मधमाशी.
प्रश्न :
काष्टापरि किडकिडीत जरि तू, विद्वत्तेची मूर्तिमती ।
तलवारीहुनि विच्छेदी तू, जरी जाय कुटिला हाती ॥
उत्तर :
विद्वत्तेचे अन् प्रतिभेचे, लेखन करिशी शब्दांनी ।
असत्य तैसे कुटिल अक्षरी, लेखणीच्या फटकार्यांनी ॥