विषयसापेक्ष कविता - देणगी
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
गोड गुलाबाची कळी । कोठे दिसेनाशी झाली ।
बाळाच्या ग गालांवर । `सापडली सापडली ॥१॥
प्राजक्ताचे देठ लाल । वार्याने का हेलावले ।
गर्द रंग उतरला । आणि रंगली पाऊले ॥२॥
जळावरी नाचतात । त्याच कळ्या कमलांच्या ।
बाळ दावि हालवोनी । `पहा माझ्या हाती आल्या' ॥३॥
फिकुटला दिसे चाफा । आणि तशीच केतकी ।
कानी कुजबुजे कोणी । बाळा अंगी आली कान्ती ॥४॥
मृदु रेशमी कुरळे । डोले लाडिक जावळ ।
वारा हळूच येऊन । हात फिरवून जाय ॥५॥
काळेभोर ते लोचन । भासे हरिण-शावक ।
दिले बक्षीस तयाने । गोड बाळास पाहून ॥६॥
छोटया ओठांचे बोळके । सदा हास्याने भरले ।
`हुं' काराने सांगितले । `घ्या हो घ्याहो' हे डबोले.
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2023
TOP