N/Aहांस बालका, हास सारखा ।
मुख-कलिका ही फुलली, मोद गंध का ?
प्रेम पवन तो, गंध पसरितो ।
सदनाचे उपवन ना, हाच खुलवितो ।
जन तुझे सख्या, भृंग जमविशीं।
मकरंदा स्वादायां, मिळति भोवतीं ।
हास्य मोहिनी, विश्वमोहिते ।
तेच तुझे हास्य बंधू, हास देवते ।
बाई हासला, मम छबूकला ।
चुंबु किती मी त्याला, तृप्ति नच मला ।
स्वारी तिकडली, ती पहा अली ।
ओळखिले, ओळखिले, छबुकडी भली ।
खचित लाडका, विश्व दिपविल, ।
हा मोठा होवुनियां, खचीत सुखविल ।
बाई पण नको, हास्य कोठले ?
चुंबु कसा मग त्याला, सकल तें नुरे ? ॥