विषयसापेक्ष कविता - स्वर - ताज

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


मंगेशीच्या रम्य परिसरीं, मंगल स्वर घुमला ।
चैतन्यानें रसरसलेला, निनाद दुमदुमला ॥
दर्‍या डोंगरीं स्फुरले निर्झर, ऐकुनि हो साथी ।
सागरतीरीं तरंग हंसरे, प्रक्षांलन करितीं ॥
कोठुनि आला, भरुनि राहिला, कसां आसमंत ।
स्वर गंगेतूनी नितळ श्रोत हा, लता कंठि घेत ॥
स्वरमाला ओघळतीं कानीं, कायापालट हो ।
राहि न मानव भूमींवरतीं, अंतराळिं तरतो ॥
नाद मधुर तव, स्वर कारंजे, आल्हादुनि नाचे ।
सप्तस्वर गे मुखीं रंग घे, इंन्द्रधनुष्याचें ॥
गान-तान-सुर-ताल, शिशुपणीं, रियाझ कठांत ।
दिनानाथ आशिर्वच लाभे, स्वर-रस-रंगांत ॥
भरतखंड भारुनि टाकिला, स्वरानंद-भक्ती ।
गीताकार, संगीत महर्षी, `विस्मय-खनि' गणिती ॥
चार तापांवरि, स्वरलावण्यें, विश्वरंगीं रमला ।
स्वरकंपन-परकीय गायनी, गळीं मुदें फिरला ॥
`गानदेवता' संगीतराज्ञी' आधिष्ठित तुज केले ।
तुझ्या सूरांनीं, विश्वबंधनीं, नाते जोडियले ॥
लतादिदी, तव गानमोहिनी, सदैव राहू दे ।
गीत सुरांच, वसंत ऋतु गे, असाच बहरु दे ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP