विषयसापेक्ष कविता - समरांगण सूत्रधार

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


(स्थापत्य शास्त्राचा इतिहास)

लिहिल्या चवथ्या शतकीं, मत्स्यपुराणींच वास्तु उल्लेख ।
ऋषिमुनि त्या समयीचे, तत्वचिंतनी प्रसिध्द ते होत ॥
नारद बृहस्पती अन्, वसिष्ठ भृगु अत्रि हे मुनीवर्य ।
शास्त्रज्ञ ज्ञात होते, अभियंते आश्रमांत शिकवीत ॥
भौतिकशास्त्र रसायन, खगोल गणितहि तसा आयुर्वेद ।
वास्तुशास्त्र ही तैसे, शिष्या अभ्यास पाठ देण्यास ॥
कश्यप शिल्पम्, मयमत् बृहत् संहिता प्रदीर्घ ग्रंथ तसे ।
मानसार, इत्यादी समरांगण सूत्रधार ही लिहिले ॥
सम-आरांगणि-अंगणिं, अर-आरा-गाडिच्याच चक्राची ।
वर्तुळ त्रिज्या रेषा, अंगण ते क्षेत्र, फोड शब्दाची ।
मध्ययुगीं हा ग्रंथच शतकी एकादशीहि लिहिलासे ।
विज्ञान तंत्रज्ञानीं, माहिती भांडार गोविले त्याते ॥
ठेव विज्ञानाचा, परंपरेचाच भारतीय तसा ।
राजा भोज, कलेचा, विद्वत्तेचा उपासकहि तैसा ॥
``विविधा वीर चुडामणि' या नामेज्ञात होय तो नृपती ।
विद्वत् जन ते येती, भारत भूमी वरुनि या प्रांतीं ॥
नृपतीं दे प्रोत्साहन, ज्ञानवर्धना तसे कलाकारा ।
रिक्त न हस्ते, निघती, ज्ञान जिज्ञासूहि येत दरबारा ॥
भोपाळ, धार नगरी, वसवियली मध्य भारता माजी ।
बांधीं धरण नदीवरि, भोजपुरीं, बेटवा जलाधारीं ॥
मंदीर बांधियले भोपालीच्या तलाव काठासी ॥
शारदसदनीं मूर्ती सरस्वतीची तिथेच स्थापियली ।
शारदपीठ म्हणोनी, वास्तुशास्त्र शिक्षणासि ती गणिली ॥
ते केन्द्र तीन शतके अभ्यासा वास्तुसाठी राहियले ।
मांडू सुलतानानें नंतर उध्वस्त करुनि टाकियले ॥
राजग्रह, देवालयि, रचना ती होय सूत्रधाराची ।
ग्रंथ प्रमान मानुनि, संमरांगण प्रणित होय रचनेची ॥
हेमाडपंत स्थपती, भोजनृपति मागुती, महाराष्ट्री ।
वास्तव्य देवगिरिला, तंत्रज्ञानांत शोध घे ध्यानीं ॥
मंदीर एकसंधी, बांधाया तंत्र शोधुनी, काढी ।
देवालय सामोरी, बांधियली दीपमाळ, तंत्राची ॥
संपूर्ण शास्त्रज्ञान, व्यवहारज्ञान त्यास ही ठावे ।
निर्णय-क्षमता घ्याया जाण हवी शास्त्र योग्य समयाते ॥
वस्तू वापर तैसा, पृथ:करण करुनिया हि स्थायी करी ।
ज्ञाने हवे स्थपतीला, सामुद्रम, गणित काव्य छंदाची ॥
ज्योतिष, रेखा, शिल्पहि यंत्रकर्मविधि हवे सिराज्ञान ।
बुध्दी येत उपयोगी, विशाल विस्तृत सखोल प्रज्ञान ॥
सागरि वास्तु वसावी, वा तीरावरि इमारती काम ।
क्षार जलाचे त्यावरि, परिणामाचीच त्यास असे जाण ॥
उंची इमारतीची, मंदिर, मूर्ती ठरेल प्रस्थानीं ।
गवाक्ष, दारे सारे ठरवितसे शास्त्रबंध त्यावरुनी ॥
कोल्हापुर देवालय, महालक्ष्मिचे प्रवेश द्वार जसे ।
त्रिपुर पौर्णिमेनंतर, सूर्यकिरण देविच्या पदासि वसे ॥
प्रकाश लहरीचाही, ध्वनिलहरींचा तयास अभ्यास ।
वास्तू उभारण्याला, निवड भूमिची, प्रथम परिक्षेस ॥
संकेत, नियम यांसीं अनुसरुनी ती तशीच वास्तु तिथें ।
तत्वज्ञाना धारित शिवमूर्ती स्थापिती खोल इथे ॥
परि त्या गजाननाची विशिष्ट उंचीवरील स्थान तिचे ।
खेडी वा नगराचे, प्रकार जाणोनि तेथ ते रचिती ॥
डोंगर पूर्व दिशेसी असणे हे योग्य ना शरीरासी ।
मानव स्वास्थ्या येती उपयुक्त किरण हो प्रभातीच्या राशी ॥
लावोनि वृक्षवल्ली पर्ण फुले वास्तुच्या सभोवार ।
ध्वनि स्पर्श गंध रंगाच भूमि परिक्षेस होत आधार ॥
उत्कृष्ट ज्ञान जवळी, सांधे-जोडणी इमारती माजी ।
अवलंबित सांध्याव्र आयु टिकाऊ असेल रचनेचे ।
अंतर्गत बाह्य तसा, मेळ पाहिजे इमारतीमध्ये ।
सांधे अधिक जेथे, एक संधि ना, लघू आयुष्याचे ॥
कार्य उपयुक्त शाश्वत, सुंदरता, त्रिमुख तत्त्व ही गाठी ।
रेखाटन वास्तूचे करण्यालागीं महत्त्व भाग सकल वसे ।
वास्तू निर्मिती होता, देखभालिलाहि महत्त्व असे ॥
कार्यी कमी श्रम होणे योग्य, तसा भास ही कमी करणे ।
उष्ण हवा वा आद्रीहि सांध्यावरती करीत परिणामे ॥
लक्ष स्थपतिचे केंद्रित होणे त्यावरि, असे महत्त्वाचे ।
जो जन्मला तयासी मृत्यु हा अटळ पर्याय दुजा नसे ।
तत्त्वे ग्रंथामधली आजहि उपयुक्त बांधकामाती ॥
स्थपतीचे यश चहूकडे ठावे ।
ज्या कारणे उभारिली वास्तू ॥
जल निस्सारण तैसे विद्युतिकरणास आले महत्व नवे ॥
शास्त्र नगर रचनेचे, पूर्वापारहि चालत आलेले ।
होत न अलग कधी ही, साकारिल गृह कलापूर्ण केलेले ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP