मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय ४३ वा पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय ४३ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ४३ वा Translation - भाषांतर ५१०शुकमहामुनि रायासी कथिती । गोप सकलही नंदादिक ॥१॥प्रवेशले मोदें त्या रंगमंडपीं । जाणूनि चिंतिती राम-कृष्ण ॥२॥धनुर्भंगादीही पाहूनि विक्रम । पालटे न मन ज्या दुष्टाचें ॥३॥ऐशा मूढ कंसा वधितां न दोष । जावें मंडपांत स्वयें आतां ॥४॥चिंतूनियां ऐसें येती राजद्वारीं । तोंचि अंगावरी येई गज ॥५॥हेतुपूर्वकचि तया माहुतानें । वळविला ऐसें पाही कृष्ण ॥६॥वासुदेव म्हणे केश ते कुरळे । मागें सारियेले श्रीकृष्णानें ॥७॥५११कसूनि कंबर गंभीर स्वरानें । म्हणे माहुतातें मागें होई ॥१॥इच्छितों मंडपीं जावें ऐसें आम्हीं । घेईं वळवूनि गजालागीं ॥२॥ऐकसी न तरी गजासवें तुज । अंगावरी क्रोधें वेगें घाली ॥४॥शुंडेमाजी तदा सत्वरी तो गज । धरितां कृष्णास, निसटे हरी ॥५॥वासुदेव म्हणे, तोडूनियां मुष्टि । लपे जगजेठी उदराखालीं ॥६॥५१२न दिसे कृष्ण तैं खवळला गज । शोधूनि तयास घ्राणेंद्रियें ॥१॥आंवळी शुंडेनें होऊनि संक्रुद्ध । निसटे क्षणांत परी कृष्ण ॥२॥पुढती जाऊनि त्याच्या पृष्ठभागीं । धरुनियां ओढी पुच्छ त्यासी ॥३॥शत हस्त नेई ओढूनियां मागें । क्रोध तैं गजातें येई बहु ॥४॥परी सव्यभागीं जातां त्या श्रीकृष्ण । वळवी ओढून वामभागीं ॥५॥वत्सपुच्छाप्रति धरुनियां बाळें । खेळती तैं चाळे करी कृष्ण ॥६॥वासुदेव म्हणे अंतीं भगवान् । पुढती येऊन ताडी हर्षे ॥७॥५१३गज तैं कृष्णासी धराया धांवतां । सभोवतीं त्याच्या फिरे कृष्ण ॥१॥गवसलों ऐसें दावी वारंवार । येतां अंगावर दूर जाई ॥२॥बहुवार तेंवी बैसतां गजही । वांकतांचि होई दूर कृष्ण ॥३॥ऐशा उठाबशा काढितांचि गज । ठेंचाळे, सहज पतन पावे ॥४॥अंतीं श्रांत होई गज, तदा कृष्ण । स्वयेंचि पतन भासवी त्या ॥५॥तदा क्रोधावेशें करितां प्रहार । दंत भूमीवर आपटती ॥६॥माहूतही तदा टोंची त्या अंकुश । होऊनि तैं क्रुद्ध पुढती धांवे ॥७॥शुंडा तैं हरीनें पिळूनि तयासी । पाडिलें भूमीसी लीलामात्रें ॥८॥उपटूनि दंत माहूतासमेत । दंतेंचि प्राणान्त केला त्यांचा ॥९॥वासुदेव म्हणे अतर्क्य विक्रम । अशक्य कांहीं न जगन्नाथा ॥१०॥५१४शस्त्रस्थानीं गजदंतचि करांत । ऐसे मंडपांत जाण्या सिद्ध ॥१॥गजरुधिराचे बिंदु अंगावरी । श्रमें वदनावरी घर्मबिंदु ॥२॥ऐसे गोपांसवें जातां मंडपांत । पाहती समस्त तयांप्रति ॥३॥शृंगारादि रस तदा मूर्तिमंत । प्रगटले तेथ प्रत्यक्षचि ॥४॥वासुदेव म्हणे कोणाप्रति कैसा । दिसे कृष्ण ऐका दक्षतेनें ॥५॥५१५चाणूरादि मल्लां वज्रासम भासे । सामान्यजनांतें नृपासम ॥१॥नंदादिकां आप्त, स्त्रियांसी मदन । वीर तो दारुण दुष्टांप्रति ॥२॥वडिलांसी बाळ, कंसालागीं काळ । विक्रमी प्रबळ अज्ञांप्रति ॥३॥परमतत्व तो भासे योगियांसी । तेंवी यादवांसी देवश्रेष्ठ ॥४॥वासुदेव म्हणे रसमय ऐसा । चिंतील जो जैसा तैसा देव ॥५॥५१६प्रत्यक्ष पाहूनि राम-कृष्णा कंस । भय अंतरांत मानी बहु ॥१॥आकर्षिती जनां मनोहर मूर्ति । लवती न पातीं कवनाचींही ॥२॥हृदयीं न मावे आनंद जनांच्या । एकमेकां त्यांच्या कथिती लीला ॥३॥बंदीगृहीं जन्म, गोकुळगमन । दुष्टनिर्दलन कथिती सर्व ॥४॥कालियामर्दन, गोवर्धनोद्धार । गोकुळा आधार जाहला हा ॥५॥राम-कृष्णलीला वर्णिती सकळ । उद्धरिलें कुळ म्हणती यांनीं ॥६॥वासुदेव म्हणे पाहूनि विक्रम । सकलही जन चकित होती ॥७॥५१७ऐकूनि जनांच्या वार्ता सभेमाजी । क्रोध चाणूरासी येई बहु ॥१॥म्हणे कृष्णा, रामा, वीर तुम्हीं दोघे । रुचतें कंसातें मल्लयुद्ध ॥२॥पाचारण तुम्हां यास्तवचि केलें । नृपा तोषविलें पाहिजेचि ॥३॥संतुष्ट नृपाळ जनां करी तृप्त । येतां काय क्रोध शिक्षा घडे ॥४॥म्हणूं नका आम्हीं मल्ल नसो ऐसें । सहज गोपांतें मल्लविद्या ॥५॥होऊनियां सिद्ध तेणें मल्लयुद्धा । संतोष नृपाचा संपादावा ॥६॥कल्याण आपुलें होईल त्या कर्मे । वासुदेव प्रेमें पुढती गाई ॥७॥५१८जाणूनि ते इष्टापत्ति । काय बोलला यदुपति ॥१॥अरे, आम्हीं वनवासी । तुम्हीं नगरनिवासी ॥२॥परी कंसाचीच प्रजा । कंसकल्याणाची इच्छा ॥३॥तेणें आज्ञा त्याची मान्य । परी मुलें आम्हीं सान ॥४॥समसमां होवो युद्ध । तेणें न घडे अन्याय ॥५॥वासुदेव म्हणे कृष्ण । ऐसें बोलला वचन ॥६॥५१९ऐकूनि ते शब्द बोलला चाणूर । बल ज्या सहस्त्र कुंजरांचें ॥१॥ऐसा कुवलयापीडही वधिसी । बालक तुजसी म्हणे कोण ॥२॥यास्तव बलाढय मल्लासीच युद्ध । तुजलागीं योग्य वाटे मज ॥३॥रामही तैसाचि महा बलवंत । बलिष्ठांसी युद्ध तुम्हां योग्य ॥४॥अन्याय न तेणें, यास्तव मजसी । सिद्ध हो युद्धासी कृष्णा, स्वयें ॥५॥मुष्टिकासी युद्ध करील हा राम । वासुदेव धन्य म्हणे दैत्य ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 28, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP