मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय १८ वा पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय १८ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय १८ वा Translation - भाषांतर २२८निवेदिती शुक राया, अन्यदिनीं । आनंदित मनीं होती गोप ॥१॥वर्णिती कृष्णाचें अद्भुत तें कृत्य । येती स्वगृहास गोप-गोपी ॥२॥राम-कृष्णसंगें ग्रीष्मही वसंत । आल्हादकारक भासे गोपां ॥३॥निर्झरप्रवाहें झिल्लरीचा शब्द । कर्कश तो लुप्त वृंदावनीं ॥४॥उदकतुषारें उल्हसित वृक्ष । शीतल सुगंधयुक्त वाय ॥५॥सरोवरें तेंवी सरिता-निर्झर - । संयुक्त, शीतल अनिल रम्य ॥६॥कल्हार, कुमुद, उत्पलादि पद्में । त्रिकाल सुगंधें युक्त वायु ॥७॥वासुदेव म्हणे तृणेंही हरित । अत्यंत सौख्यद गोपजनां ॥८॥२२९वृंदावनीं जल विपुल नद्यांसी । पुलिनें व्यापिती उर्मि त्यांच्या ॥१॥तेजें घट त्यांचे हरित तृणांनीं । आच्छत्र न ग्रीष्मीं तप्त होती ॥२॥तया रम्य वनीं हरिणांची क्रीडा । प्रेक्षकांच्या चित्ता मोद देई ॥३॥मयूर, कोकिळा, सारसही गाती । भ्रमर गुंजती मधुपानें ॥४॥ऐशा तयावनीं सवंगड्यांसवें । वाजविती पांवे राम-कृष्ण ॥५॥क्रीडा, वनमाला, वृक्षांचे पल्लव । म्हणे वासुदेव प्रिय गोपां ॥६॥२३०गेरु-पिवडीनें अंग । रंगवूनि क्रीडादंग ॥१॥नृत्य, गायन करिती । राम कृष्णां तोष देती ॥२॥नाचूं लागतां श्रीकृष्ण । करिती गोपाल गायन ॥३॥मुरल्या शृंगें वाजविती । कृष्णा, वाहव्वारे बोलती ॥४॥हर्षे वाजवूनि टाळ्या । प्रशंसिती ते गोपाळा ॥५॥रंगभूमीवरी नट । एकमेकां एकमेक ॥६॥गोप तेंवी राम-कृष्णां । प्रशंसिती तयास्थाना ॥७॥वासुदेव म्हणे गोप । होते देवचि प्रत्यक्ष ॥८॥२३१भ्रामण, लंघन, क्षेप, आस्फोटन । तेंवी विकर्षण क्रीडायुद्ध ॥१॥राम-कृष्ण ऐसे काकपक्षधारी । कालिंदीच्या तीरीं करिती क्रीडा ॥२॥नाचतां गोप हे करिती गायन । देती प्रोत्साहन तेंवी गोपां ॥३॥बिल्व-कुंभफळें तेंवी आमलक । घेऊनि क्रीडेंत दंग होती ॥४॥कदा नेत्रबंध, मृग-खगचेष्टा । रुजु वक्र उडया मारिताती ॥५॥दर्दुरप्लाव तैं कदा उपहास । कदा होती नृप राम-कृष्ण ॥६॥वासुदेव म्हणे ऐशा स्वैरक्रीडा । करुनि बालकां तोष देती ॥७॥२३२एकदां प्रलंब येई वनीं गोपवेषें ॥पळवूनि न्यावें कृष्णा ऐसें मनीं होतें ॥१॥जाणूनियां तें श्रीकृष्णें वांटूनियां गडी ॥खेळ आरंभिले बहु तदा वनामाजी ॥२॥पक्षप्रमुख ते दोघे होऊनि खेळती ॥बाह्यवाहकलक्षण क्रीडा आरंभिती ॥३॥‘भांडारीक’ नामें वटासन्निध पातले ॥रामपक्षानें कृष्णाच्या पक्षातें जिंकिलें ॥४॥वासुदेव म्हणे ऐसा संपला तो खेळ ॥पाठीवरी घेती आतां एकेकासी बाळ ॥५॥२३३जाणूनियां बळ कृष्णाचें प्रलंब । तयाच्या पक्षांत शिरला होता ॥१॥दामा नामें गोपा उचली श्रीकृष्ण । तेंवी भद्रसेन ‘वृषभ’ गोपा ॥२॥प्रलंभ उचली बळिरामाप्रति । घेऊनियां जाती दूर दूर ॥३॥चुकवूनि कृष्णा, प्रलंब रामासी । साधूनियां संधि दूर नेई ॥४॥भूमिभारवाह शेषाचा त्या भार । जाहला असह्य प्रलंबासी ॥५॥वासुदेव म्हणे तदा प्रलंबानें । मूळ रुप केलें प्रकट वनीं ॥६॥२३४सुवर्णालंकार किरीट कुंडलें । रुप तें भासलें मेघासम ॥१॥स्कंधीं बलराम भासला तो चंद्र । रुप ते प्रचंड राक्षसाचें ॥२॥लंबायमान त्या दाढा भयंकर । इंगळचि नेत्र भासती ते ॥३॥अग्निज्वालेसम केश स्कंधावरी । रामही अंतरीं भय मानी ॥४॥आकाशासम तें वाढूं लागे रुप । जाणिलें कपट तदा रामें ॥५॥वज्रमुष्टि तया हाणिली मस्तकीं । धार रुधिराची तदा वाहे ॥६॥वासुदेव म्हणे कोसळावा गिरिं । तेंवी दैत्य खालीं मरुनि पडे ॥७॥२३५कळतां तें वृत्त आनंदले गोप । प्रेमें बलरामास आलिंगिती ॥१॥संकटचि मोठें म्हणती टळलें । नवल वाटलें सकलांप्रति ॥२॥चिरंजीव होईं रामा, रक्षीं आम्हां । बोलूनि स्तवना करिती त्याच्या ॥३॥पुष्पवृष्टि तदा केली विबुधांनीं । वध तो पाहूनि दुर्जनांचा ॥४॥वासुदेव म्हणे रामाची प्रशंसा । अत्यानंदें तदा करिती गोप ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP