मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय १३ वा पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय १३ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय १३ वा Translation - भाषांतर १५२निवेदिती शुक, राया परीक्षिता । भागवतश्रेष्ठा भाग्यवंता ॥१॥प्रश्नें तुझ्या कथा रंगेल ही आतां । येई नूतनता रसालागीं ॥२॥विषयलंपटां नित्य नूतनत्व । येई विलासांत जैशापरी ॥३॥तैसी कथेमाजी भक्तांप्रति गोडी । नित्य नूतनचि वाटतसे ॥४॥एकचि तो त्यांसी ध्यानीं मनीं ध्यास । आतां हो एकाग्र परीक्षिता ॥५॥गुह्यचि हे कथा कथितों तुजसी । गुह्यही भक्तांसी निवेदावें ॥६॥प्रेम ज्या शिष्याचें गुरुवरी श्रेष्ठ । निवेदावें त्यास सकल गुह्य ॥७॥वासुदेव म्हणे ऐक्यभाव जेथें । गुह्य काय तेथें राहूं शके ॥८॥१५३दैत्यमुखांतूनि बाळें यमुनातीरासी ॥मुक्त होतां आनंदानें धांवूनियां येती ॥१॥रम्य विशाल तें बहु वाळवंट तेथें ॥गोपबालकां क्रीडेसी अनुकूल होतें ॥२॥कालिंदी उदकीं रम्य फुललीं कमळें ॥स्थान सर्व त्या सुगंधें सुगंधित झालें ॥३॥भ्रमरगुंजन तेणें होई तयास्थानीं ॥किलकिला शब्द गाती पक्षी रम्य रानीं ॥४॥आल्हाददायक शोभा पाहूनि ती कृष्ण ॥५॥सवंगड्यांलागीं बोले आनंदें वचन ॥६॥वासुदेव म्हणे हरीवचनपीयूष ॥७॥ऐकूनियां गोपबाळां सर्वदा संतोष ॥८॥१५४गडेहो, हें स्थान असे बहु रम्य । परी न्याहारी न अजूनि झाली ॥१॥जाहलों पीडित क्षुधेनें सकल । प्राशितील जल वत्सें प्रेमें ॥२॥त्या रम्य हिरव्यागार भूमीवरी । चरोत हीं सारीं वत्सें हर्षे ॥३॥आनंदें आपण करुंया भोजन । पाळिती वचन गोप तेंचि ॥४॥पुढती शिदोर्या सर्व शिंक्यांतूनि । पातले घेऊनि हर्षे गोप ॥५॥वासुदेव म्हणे सर्व कृष्णासवें । भोजनीं रंगले अत्यानंदें ॥६॥१५५कर्णिकेसमान करिती ते रांगा । घेऊनि श्रीरंगा मध्यभागीं ॥१॥सान सान बाळें बैसलीं पुढती । त्या मागें बैसती मोठमोठीं ॥२॥कमलपत्रांच्या रांगा जैं शोभती । तेंवी बालपंक्ति शोभिवंत ॥३॥पुष्पें, पर्णे, साली, शिंकीं वा आपुलीं । पात्रस्थानीं घेती पाषाणही ॥४॥भाजी-भाकरीची करिती वांटणी । आपुल्या स्तवूनि करिती थट्टा ॥६॥वासुदेव म्हणे कटीसी खोंचिली । श्रीकृष्णें मुरली तयावेळीं ॥७॥१५६वेत्रयष्टि शिंग वाम काखेमाजी । ग्रास तळहातीं दहिंभाताचा ॥१॥बोटांवरी लिंबू लोणचें चटण्या । मध्यभागीं कृष्ण उभा त्यांच्या ॥२॥यज्ञभोक्ता हरी हास्यविनोदानें । करी गोपांसवें भोजनासी ॥३॥भोजनोत्सव तो पाहूनि देवही । कौतुकांत पाहीं मग्न होती ॥४॥वासुदेव म्हणे आनंदा भरती । प्रारंभ दु:खासी त्याची क्षणीं ॥५॥१५७कोवळें कोवळें तृण धेनुवत्सें । भक्षीत आशेनें दूर गेलीं ॥१॥अदर्शनें त्यांच्या घाबरले गोप । धांवले शोधार्थ त्यजूनि अन्न ॥२॥पाहूनि तें कृष्ण म्हणे जेवा स्वस्थ । वत्सांप्रति भय नसे कांहीं ॥३॥जावूनियां मीचि शोधितों तयांसी । बोलूनि गोपांसी कृष्णनाथ ॥४॥वामकरीं ग्रास घेऊनि तैसाचि । शोधाया वत्सांसी पुढती झाला ॥५॥निबिड काननें, गुहा, लताकुंज । शोधिली उखरभूमीही ते ॥६॥वासुदेव म्हणे वत्सें न दिसती । लीला श्रीहरीची अलौकिक ॥७॥१५८अघासुरमोक्ष पाहूनि विरंचि । लीलादर्शनाची इच्छा करी ॥१॥यास्तव तयानें साधूनि संधि । हरुनि वत्सांसी गुप्त झाला ॥२॥शोधार्थ वत्सांच्या हिंडतां श्रीकृष्ण । गोपही हरुन नेई ब्रह्मा ॥३॥शोध न वत्सांचा पाहूनियां कृष्ण । येतां परतून वाळवंटीं ॥४॥गोपही तयासी दिसती न कोठें । कृत्य विरंचीचें जाणी तदा ॥५॥वासुदेव म्हणे कृष्णभगवान । विचार करुन पाही मनीं ॥६॥१५९व्यर्थ खटाटोप होईल ब्रह्मयाचा । गोप धेनु वत्सां आणिलीया ॥१॥एकटें व्रजांत जातां गोपी, गाई । पावतील पाही खेद मनीं ॥२॥मोह विरंचीचा निरसो म्हणून । कौतुक श्रीकृष्ण करी वनीं ॥३॥विष्णुमय जग ऐसें श्रुतिवाक्य । करावया सिद्ध चिंती जणु ॥४॥अंतीं सकल तीं वत्सें तेंवी गोप । नटला स्वयेंच लीलाधारी ॥५॥हुबेहुब रुप घेई सकलांचें । तेंवी क्रीडनकें कंदुकादि ॥६॥वासुदेव म्हणे आत्मरुपें ऐसा । नटूनि व्रजांचा धरिला पंथ ॥७॥१६०मुरलीचा नाद ऐकूनियां गोपी । स्वागतार्थ येती बालकांच्या ॥१॥चेंडू लगोर्या ते झेलित फेंकित । पातले सानंद नित्यापरी ॥२॥आपुलाल्या गृहीं वत्सांसवें येतां । आलिंगूनि माता पाजिती त्यां ॥३॥न्हाऊं-माखूं त्यांतें घालिती कौतुकें । सुगंधप्रलेपें गोपस्त्रिया ॥४॥वस्त्रभूषणांनीं भूषविती तयां । धेनूहि पातल्या सदनामाजी ॥५॥पाहूनियां वत्सां हुंकारें धांवती । आनंदें चाटिती वत्सांप्रति ॥६॥वासुदेव म्हणे धेनू पान्हावूनि । वत्सांतें पाजूनि तुष्ट होती ॥७॥१६१गाई गोपीही त्या वत्स-गोपांवरी । धरिती अंतरीं प्रेम बहु ॥१॥अनासक्त हरी करी सर्व कर्म । नव्हतेंचि ठाऊकें कवणातेंही ॥२॥वत्सरुपी हरी चरायासी जाई । क्रीडासक्त होई गोपरुपें ॥३॥बळिरामही न जाणें हें कौतुक । लोटले कित्येक दिवस ऐसे ॥४॥पंच-षष्ठदिन न्यून जों अब्दासी । होई कौतुकचि तदा वनीं ॥५॥वासुदेव म्हणे गोवर्धनावरी । धेनु तयावेळीं चरत होत्या ॥६॥१६२एका स्थळीं वत्स, धेनु अन्यभागीं । चरावया नेती नित्य गोप ॥१॥अद्य गोवर्धनगिरीच्या सन्निध । नेले होते वत्स, धेनू वरी ॥२॥पाहूनि त्या वत्सां प्रेमें धांव घेती । यत्नेंही गोपांसी ऐकतीना ॥३॥कांसेतूनि त्यांच्या दुग्ध ओतूं लागे । हंबां हंबां ऐसे करिती शब्द ॥४॥वत्सांसी हुंगूनि पाजिती चाटिती । गिळूनि टाकिती प्रेमें वाटे ॥५॥नूतन वत्सांसी सोडूनि पाडशा । धरिती वत्सांचा लोभ बहु ॥६॥खट्याळ पोरांनीं आणिले हे वत्स । मानूनियां गोप क्रुद्ध होती ॥७॥वासुदेव म्हणे ताडनार्थ येती । परी शांत होती पाहूनियां ॥८॥१६३मारावया ज्यांसी पातले धांवूनि । तयांसी उचलूनि घेती प्रेमें ॥१॥हृदयीं धरुनि हुंगिती मस्तकें । पाहती कौतुकें वदनें त्यांचीं ॥२॥पुढती कष्टानें घेऊनि धेनूंसी । गिरीवरी जाती नाइलाजें ॥३॥गोप-धेनूंचें तें पाहूनियां प्रेम । चित्तीं बलराम चिंतीतसे ॥४॥अलौकिक ऐसें प्रेम न पाहिलें । साशंकित झालें मन माझें ॥५॥वाटे हे कोणाची मायाचि असावी । दैवी कीं मानवी राक्षसी वा ॥६॥वासुदेव म्हणे अंतीं बळराम । म्हणे अन्याचें न सामर्थ्य हें ॥७॥१६४राक्षसी वा मानवांची । माया काय मजपुढती ॥१॥मोही भ्रमानें रामातें । ऐसें बळ न अन्यातें ॥२॥यास्तव हें हरिलीला । ऐसा निर्णय जाहला ॥३॥अंतीं अंतर्ज्ञानें पाही । कृष्णरुप ते सर्वही ॥४॥वत्स, वत्सपाल, कृष्ण । स्पष्ट पाही बलराम ॥५॥वासुदेव म्हणे राम । वदे कृष्णासी वचन ॥६॥१६५कृष्णा, गोवत्स हे ऋषी - मुनीअंश । गोप हे देवांश मानियेले ॥१॥तत्त्वदृष्टया रुपें तुझींचि हीं अद्य । पाहूनि आश्चर्य वाटतसे ॥२॥कारण तयाचें कथीं मज कृष्णा । निवेदी तैं रामा सकल कृष्ण ॥३॥वासुदेव म्हणे ऐकूनि ते लीला । आनंद जाहला बळिरामासी ॥४॥१६६ब्रह्मा येऊनियां पाही जों गोकुळीं । नवलचि करी चित्तीं तदा ॥१॥गोवत्स, गोपाल आनंदें क्रीडती । मोहमग्न मति तदा त्याची ॥२॥वत्स, वत्सपाल नेऊनियां दूर । ठेविले वत्सर लोटलें त्या ॥३॥मग तितुकेचि, तैसेचि हे एथें । क्रीडती आनंदें कैशापरी ॥४॥सत्य हे कीं ते, हें न कळे मजसी । गुंग होई मति नवल करी ॥५॥परीक्षा कृष्णाची पहावया आला । गोंधळूनि गेला परी स्वयें ॥६॥वासुदेव म्हणे सूर्याच्या पुढती । काय काजव्याची दीप्ति असे ॥७॥१६७थोरांवरी क्षुद्रें टाकूनियां पाश । गुंतावें स्वयेंच तयामाजी ॥१॥तैसीच हे स्थिति होई विरंचीची । कौतुक तैं त्यासी दावी प्रभु ॥२॥वत्स, वत्सपाल सर्व चतुर्भुज । कृष्णचि प्रत्यक्ष दिसले तया ॥३॥शंख चक्र पीतांबर वनमाला । किरीट कुंडलां शोभा बहु ॥४॥भक्तवत्सल तो विविध स्वरुपें । पाहूनि ब्रह्ययाचें हरलें भान ॥५॥बाहुलीसमान जाहला विरंची । राहिला पुढती स्तब्ध उभा ॥६॥वासुदेव म्हणे भांबावला ब्रह्मा । मग अन्य कोणा थांग लागे ॥७॥१६८भ्रमला विरंचि पाहूनि दयाळ । आंवरूनि खेळ कृपा करी ॥१॥अतर्क्य अगाध आवरितां माया । येई ब्रह्मदेवा पुन: शुद्धि ॥२॥फलपुष्पाकीर्ण पाही वृंदावन । विकारविहीन सकल जीव ॥३॥गोपांसवें वत्स चोरितां श्रीकृष्ण । शोधामाजी मग्न होता त्यांच्या ॥४॥करामाजी एका होता दहींभात । सवंगडी वत्स शोधीतसे ॥५॥सामान्यासम ही पाहूनियां कृति । वाहनाखालतीं उतरे ब्रह्मा ॥६॥प्रेमाश्रुपूरेंत्या न्हाणिले चरण । भयाभीत मन होई त्याचें ॥७॥वासुदेव म्हणे नम्रभावें स्तुति । करितो विरंचि तेचि ऐका ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 17, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP