मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय ११ वा पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय ११ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ११ वा Translation - भाषांतर १२१उन्मळतां वृक्ष होई घोर नाद । नंदादिक गोप धांव घेती ॥१॥उन्मळले वृक्ष कैसे तें कळेना । बघतां तेथ कृष्णा, पडला भ्रम ॥२॥राक्षसांचें घोर मानिती तें कृत्य । अनर्थसूचक म्हणती चिन्हें ॥३॥निश्चय कांहीं न परी होई त्यांचा । तोंच बाळें वृत्ता निवेदिती ॥४॥म्हणती ओढितां श्रीकृष्णें उखळ । वृक्ष हे समूळ पडले खालीं ॥५॥दिव्य पुरुषही प्रगटले दोन । ऐकूनि हें भ्रम नंदादिकां ॥६॥वासुदेव म्हणे अलौकिक कृत्यें । पाहूनिही कैसे भ्रमती मूढ ॥७॥१२२इतुक्यांत नंद पाही बद्ध कृष्णा । हांसूनि बंधना मुक्त करी ॥१॥पुढती नेणत्या लेंकरासमान । वर्ते बालकृष्ण जाणूनीच ॥२॥कोणी कृष्ण गातो मधुर हा किती । ऐसें बोलतांचि गाऊं लागे ॥३॥नाचतो हा छान म्हणतां वा कोणी । तत्काळ नाचूनि सुखवी जनां ॥४॥कोणी कांहीं काम सांगतांचि करी । न होतांही धरी हुरुप मोठा ॥५॥वासुदेव म्हणे कोणी थोपटितां । दंड, तोही थापा मारी स्कंधीं ॥६॥१२३गोप-गोपिकांचें खेळणें यापरी । होऊनियां हरि सुखवी तयां ॥१॥भगवंत भक्ताधीन ऐशापरी । पाहूनि अंतरीं सुजनां तोष ॥२॥अज्ञही त्या लीला पाहूनि हर्षती । ऐसा सकलांसी मोद वाटे ॥३॥एकदां माळीन विकावया बोरें । येतां बहु पोरें जमलीं तेथ ॥४॥पाचारिली कृष्णें आपुल्या सदनीं । ओंजळ भरुनि देई धान्य ॥५॥माळीणही बोरें प्रेमें तितुकींच । अर्पितां अपूर्व नवल होई ॥६॥वासुदेव म्हणे पांटी ते बोरांची । नवरत्नें साची भरुनि जाई ॥७॥१२४गोपबाळांसवें पुढती राम-कृष्ण । होती क्रीडामग्न यमुनातीरीं ॥१॥एकदां रोहिणी पाचारी तयांसी । परी भान त्यांसी नव्हतें कांहीं ॥२॥यास्तव बहुत मारितांही हांका । न येतां यशोदा येई तेथें ॥३॥गोपबाळांप्रति म्हणे ती क्षुधार्त । जाहलांती खेळ पुरे आतां ॥४॥बलरामा, आणीं तूं तरी कृष्णातें । कृष्णा, भोजनातें चला गृहीं ॥५॥प्रतीक्षा तुमची पाहती वडील । अंगावरी धूळ पडली किती ॥६॥सवंगडी कैसे पहा हे सजले । अलंकार ल्याले करुनि स्नान ॥७॥वासुदेव म्हणे यशोदा कृष्णासी । जाऊं सदनासी ऐसें म्हणे ॥८॥१२५कृष्णा, तूंही करीं स्नान । करी आनंदें भोजन ॥१॥लेऊनियां अलंकार । मग खेळें बा, खुशाल ॥२॥तुझा वाढदिवस आजी । चल सौख्यें सदनामाजी ॥३॥ऐसें बहु विनवूनि । माता सदनीं त्यां आणीं ॥४॥उभयांसी घालूनि स्नान । तेंवी सुग्रास भोजन ॥५॥अलंकार लेवविले । वाढदिवसविधि केले ॥६॥वासुदेव म्हणे कृष्ण । केवळ तो सुखसदन ॥७॥१२६ऐसा कांहीं काळ लोटतां श्रीकृष्ण । इच्छी वृंदावन शोभवावें ॥१॥प्रेरणेनें त्याच्या वृद्ध गोपांप्रति । इच्छा होई तेचि एक्या दिनीं ॥२॥ज्ञान-वयोवृद्ध ‘उपनंद’ गोप । देशकालबोध तयालागीं ॥३॥सर्व गोपांप्रति बोलला तो ज्ञाता । वर्षाव विघ्नांचा होई एथें ॥४॥पूतना, शकट तेंवी तृणावर्त । येतां सुदैवेंच कृष्णलाभ ॥५॥अर्जुनवृक्ष हे उन्मळले परी । वांचला श्रीहरि बाळांसवें ॥६॥वासुदेव म्हणे बोले उपनंद । अन्य स्थळ योग्य वाटे आतां ॥७॥१२७गोपहो, सुखानें आतां जाऊं वृंदावनीं ॥त्यागूनि गोकुळ बाल-गोपालां घेऊनि ॥१॥सन्निध तयाच्या बहु वनें उपवनें ॥चारापाणीही विपुल भोगा आनंदानें ॥२॥आयुरारोग्याभिवृद्धि होईल त्या स्थानीं ॥मुलें-लेकुरें निर्भय खेळतील रानीं ॥३॥मान्य हें तुम्हांसी तरी आजचि हें स्थान ॥सोडूं, गाडयांमाजी भरुं आपुलें सामान ॥४॥वासुदेव म्हणे उपनंदाचा विचार ॥मान्य होऊनियां गाडे भरिताती सर्व ॥५॥१२८सकल साहित्यासवें वृद्ध स्त्रिया बाळें ॥घेऊनि गाड्यांत गोप आनंदें चालले ॥१॥स्वयें चापपाणी पुढें उपाध्यायादिक - ॥घेऊनियां, वाद्यघोषें आक्रमिती पंथ ॥२॥मूल्यवान वस्त्रें, अलंकार कुंकुमाची - ॥उटी लावूनियां, गोपी कृष्णलीला गाती ॥३॥आपआपुल्या शकटीं बैसती आनंदें ॥एकामागें एक ऐसे जाती बहु गाडे ॥४॥राम-कृष्णांसवें देवी रोहिणी यशोदा ॥रथामाजी बैसूनियां क्रमिताती पंथा ॥५॥वासुदेव म्हणे अर्धचंद्राकार ग्राम ॥वसवूनि शोभविती गोप वृंदावन ॥६॥१२९वृंदावन, गिरि गोवर्धन तेंवी । पुलिनें बरवीं कालिंदीचीं ॥१॥पाहूनियां राम कृष्ण मनीं धाले । क्रीडेंत रंगले अत्यानंदें ॥२॥आतां राम-कृष्ण जाहले गुराखी । समान वयाचीं बाळें बहु ॥३॥पांवे, अलगुजीं, शिंगें तैं मुरल्या । निनादूं लागल्या वृंदावनीं ॥४॥चेंडु चेंडुफळ्या, यष्टिका घेऊनि । वत्सांसवें रानीं जाती मोदें ॥५॥पांवा अलगुज कदा ते मुरली । शोभवूं लागली राम-कृष्णां ॥६॥गोफणींनीं कदा फेंकिती पाषाण । घुंगुर बांधून नृत्य कदा ॥७॥कदा पांघरुनि कंबल वृषभ - । होऊनियां झुंज घेती स्वयें ॥८॥कदा हंस कदा मयूर होऊन । करावे त्यांसम हावभाव ॥९॥वासुदेव म्हणे शुकादि पक्ष्यांचे । शब्द करुनि ते क्रीडताती ॥१०॥१३०सवंगड्यांसवें एकदां त्या रानीं । आनंदित मनीं राम-कृष्ण ॥१॥क्रीडतां, वधार्थ त्यांच्या एक दैत्य । होऊनियां वत्स प्राप्त झाला ॥२॥ओळखूनि कृष्णें तया बळिभद्रा । खुणावूनि गेला जवळी त्याच्या ॥३॥पुच्छ चरणही धरुनि तयाचे । भोंवंडी तयातें लीलामात्रें ॥४॥ऐसा गतप्राण होतां कपित्थांच्या - । वृक्षीं, देह त्याचा फेंकियेला ॥५॥अंतकाळीं रुप मायावी न राही । मूळरुप होई प्रगट तदा ॥६॥वासुदेव म्हणे एका कर्मे दोन । कार्ये साधी कृष्ण म्हणती गोप ॥७॥१३१प्रचंड राक्षसदेहाच्या आघातें । पक्व तीं कपित्थें गळती बहु ॥१॥पाहूनि तें कृत्य स्तविती त्या गोप । सुमनवर्षाव करिती देव ॥२॥ऐसे सर्वलोकसंरक्षक दोघे । रक्षिती गोपांतें अत्यानंदें ॥३॥शिदोर्या घेऊनि वनामाजी नित्य । चारिताती वत्स ऐशापरी ॥४॥वासुदेव म्हणे परमआनंद । लुटिती तो गोप परम भाग्यें ॥५॥१३२निवेदिती शुक परीक्षिताप्रति । यमुनेवरी नेती वत्सें गोप ॥१॥जलप्राशनार्थ एकदां संतोषें । उदक प्राशिलें आपणही ॥२॥इतुक्यांत वज्रभग्न गिरिशृंग । विशाल तें अंग ऐसें ज्याचें ॥३॥बकपक्षी ऐसा पातला त्या स्थानीं । तयातें पाहूनि गोप भ्याले ॥४॥तीक्ष्ण चंचूचा तो दैत्य बकनामा । विक्रमें दैत्यांना तोष त्याच्या ॥५॥वासुदेव म्हणे बलाढय राक्षस । श्रीकृष्णवधार्थ ऐसे येती ॥६॥१३३पाहतां पाहतां चंचूमाजी बक । घेऊनि कृष्णास गट्ट करी ॥१॥बलरामासवें गोप तैं मूर्च्छित । होती, घोर कृत्य पाहूनियां ॥२॥विरंचीचा पिता सुत जो नंदाचा । बकानें गिळितां नवल करी ॥३॥तालुप्रदेशींचि अडकूनि दाह - । करी, तें असह्य बका होई ॥४॥अंतीं ओकूनियां क्रोधानें कृष्णासी । धांवला पुढती चंच्वाघाता ॥५॥तदा भक्तकाजकल्पद्रुमें चोंच । धरुनि तयास चिरिला उभा ॥६॥लव्हाळा पिंजिती कृष्ण तैं बकासी । पिंजितां गोपांसी हर्ष वाटे ॥७॥वासुदेव म्हणे अत्यानंदें देव । सुमनवर्षाव करिती बहु ॥८॥१३४दैत्यदाढेंतूनि वांचलारे कान्हा । म्हणूनि आलिंगना देती गोप ॥१॥गतप्राणचि ते जाहले सप्राण । जणु ऐसें मन तुष्ट त्यांचें ॥२॥सायंकाळीं गृहीं जाऊनि तें वृत्त । गोप - गोपिकांस कथिती बाळें ॥३॥ऐकूनि कौतुक मानिताती सर्व । बघती वारंवार कृष्णमुख ॥४॥म्हणती आजवरी आले बहु दैत्य । ज्वालेंत शलभ तैसे मेले ॥५॥वासुदेव म्हणे प्रहर्षित गोप । बोलले नंदास विश्वासानें ॥६॥१३५नंदा, विप्रवाक्य मिथ्या । कैसें होईल तें कदा ॥१॥नारायणासम गुणी । वदले पुत्र गर्गमुनीं ॥२॥येई वारंवार तेंचि । नंदराया, प्रत्ययासी ॥३॥रायाप्रति म्हणती शुक । ऐसे भाग्यवंत गोप ॥४॥संसाराचें न त्यां भान । कृष्णचरित्रांत मग्न ॥५॥वासुदेव म्हणे गोप - । गोपिकांचें थोर भाग्य ॥६॥१३६बहुविध ऐसे खेळ खेळे हरि । लंपडाव करी गोपांसवें ॥१॥सेतुबंधनही यमुनातीरासी । चेष्टा मर्कटांची करी नित्य ॥२॥उड्या तयांसम मारीत थोर थोर । ऐसे बहु खेळ करी मोदें ॥३॥कृष्ण बलराम वृंदावनीं ऐसे । गोप-गोपिकांतें तोष देती ॥४॥वासुदेव म्हणे बालक्रीडा मोदें । करिती बालकें तींच धन्य ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 17, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP