मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय २५ वा पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय २५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय २५ वा Translation - भाषांतर ३०३राया, गोवर्धनयज्ञ पूर्ण होतां । देवेंद्राच्या चित्ता असंतोष ॥१॥मीचि ईश ऐशा अहंभावें तेणें । क्रोधें पाचारिलें सांवर्तकां ॥२॥प्रलयमेघां त्यां गोकुळनाशाची । आज्ञा देवेंद्राची होई तदा ॥३॥म्हणे तो, गोपांसी बहु गर्व झाला । अवमान केला माझा ऐसा ॥४॥सामान्य कृष्णाचें मानूनि वचन । पोर अहंमन्य न जाणतां ॥५॥गोधनमदानें धुंद हे गोपाळ । उद्धट वाचाळ कृष्ण मूढ ॥६॥ऐरावतारुढ साह्य मी तुम्हांसी । वधा गाई, म्हशी सकल यांच्या ॥७॥वासुदेव म्हणे स्वयें जो गर्विष्ठ । मानी तो अन्यास गर्वयुक्त ॥८॥३०४प्रलयार्थ बद्ध मेघ ते मोकळे - । होतांचि धांवले वृंदावनीं ॥१॥आहव प्रवह वायु तयां साह्य । राया, वर्णूं काय रुप त्यांचें ॥२॥वज्रप्रहारशा गर्जना करिती । काननीं लवती विजा बहु ॥३॥वर्षाव गारांचा तेथें होऊंलागे । पर्जन्यधारा ते गजशुंडा ॥४॥जलमय धरा होऊनियां गेली । सर्वत्र जाहली समानता ॥५॥वासुदेव म्हणे तदा गोकुळांत । जाहला आकांत वर्णवेना ॥६॥३०५प्रलयकालीन पर्जन्य । शैत्य होई न सहन ॥१॥अनावर तुटे वारा । जीव गोपांचा घाबरा ॥२॥सर्व गेले कांकडून । येती कृष्णासी शरण ॥३॥म्हणती कोपाविष्ट देव । आम्हां त्राता तूं माधव ॥४॥सद्गुणीही असूनि देव । होई तयांप्रति गर्व ॥५॥कर्म इंद्राचेंचि ऐसें । कळलें पूर्वीचि कृष्णातें ॥६॥गर्वनिवारण त्याचें । अनुग्रह हाचि त्यातें ॥४॥वासुदेव म्हणे कृष्ण । करी यापरी चिंतन ॥५॥३०६मम गाई-गोप रक्षितों मी आतां । चिंतूनि हरीचा ठरला बेत ॥१॥बालक भूछत्र उत्पाटी सहज । तेंवी गिरिराज उत्पाटिला ॥२॥चार कोश लांब तोलूनियां धरी । स्वकरें सत्वरी जगन्नाथ ॥३॥पाचारुनि मग गोप-गोपींप्रति । म्हणे आश्रयासी यावें सुखें ॥४॥गिरिपतनाची शंका न धरावी । आतां भय नाहीं पर्जन्याचें ॥५॥ऐकूनि तें गोप - गोपिका आनंदें । धेनु-वत्सांसवें धांव घेती ॥६॥भरुनियां गाडे आणिती सामान । कथी वर्तमान वासुदेव ॥७॥३०७गोप-गोपी सर्व गोवर्धनाश्रित । क्षुधा तृषा त्यांस न बाधेचि ॥१॥श्रीहरीदर्शनें भान हरे त्यांचें । सप्त दिन ऐसे निघूनि जाती ॥२॥करें तोलूनियां पर्वत श्रीहरी । संरक्षण करी निजभक्तांचें ॥३॥पाहूनि तें कृत्य देवेंद्र विस्मित । हरे सर्व दर्प क्षणामाजी ॥४॥आंवरितां तेणें मेघ, दिशा स्वच्छ । श्रीकृष्ण गोपांस वदला तदा ॥५॥भय नसे आतां गोपहो, व्हा दूर । हर्षित अंतर सकलांचें तैं ॥६॥वासुदेव म्हणे परिवारासवें । गोप दूर झाले तयावेळीं ॥७॥३०८सुस्थळीं सकळ धेनु, गोप-गोपी । पाहूनि जगजेठी नवल करी ॥१॥सकलां समक्ष गिरि ठेवी खालीं । नंद कवटाळी तदा कृष्णा ॥२॥अत्यानंदें गोप प्रेमें अलिंगिती । आशीर्वाद देती पुरोहित ॥३॥ओवाळिती गोपी दध्योधन, जल । धन्य माझा बाळ म्हणे माता ॥४॥राम-रोहिणीही आलिंगिती तया । अत्यानंद देवां स्वर्गामाजी ॥५॥पुष्पवृष्टि तेंवी दुंदुभीचा नाद । तुंबर नारद गीत गाती ॥६॥राम-कृष्णभेटी घेऊनियां गोप । जाती गोकुळांत अत्यानंदें ॥७॥वासुदेव म्हणे हर्षभरें गोपी । मार्गामाजी गाती कृष्णगीतें ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP