मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय १ ला पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय १ ला सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय १ ला Translation - भाषांतर १योगेश्वर कृष्ण, व्यास-शुकांप्रति । अनन्य भक्तांसी तेंवी वंदू ॥१॥केवळ दशम स्कंध हा पावन । गातां नारायण तोष पावे ॥२॥परीक्षिती म्हणे शुकमहामुने । लोकोत्तर कर्मे श्रीविष्णुचीं ॥३॥कथूनियां कृपा करा मजवरी । अगाध श्रीहरीगुणलीला ॥४॥विषयविन्मुख ज्ञाते जीवन्मुक्त । श्रीहरिलीलेंत रमती नित्य ॥५॥मुमुक्षूही नित्य औषधासमान । करितो सेवन हरिलीलांचें ॥६॥विषयीजनही नित्य नूतनचि । लालसा धरिती कथेची या ॥७॥वासुदेव म्हणे तात्पर्य या लोकीं । श्रीकृष्णकथेची सकलां रुचि ॥८॥२पूर्वजांपासूनि संबद्ध मी एथें । राव म्हणे वाटे बहु उल्हास ॥१॥भीष्म-द्रोणादिक जगीं जे अजिंक्य । तेही पांडवार्थ जिंकियेले ॥२॥प्रार्थितां मातेनें रक्षिलें मजसी । पहा गर्भांतचि यादवानें ॥३॥पौरवांचें कुळ रक्षिलें यायोगें । लोकनियंत्याचें वृत्त सांगा ॥४॥देवकी-रोहिणी हलधरमाता । कैशा तें निवेदा मजलागीं ॥५॥वासुदेव म्हणे राव उतावीळ । श्रीकृष्णचरित्र ऐकावया ॥६॥३कृष्णनाथ गोकुळांत । गेला कां तें सांगा मज ॥१॥कवण्या ठाईं नंदागृहीं । राहिला, ते कथा गावी ॥२॥गोकुळीं वा मथुरेमाजी । कृत्यें काय काय त्याचीं ॥३॥कंसमातुलाचा वध । करुनि काय तया प्राप्त ॥४॥द्वारावतीमाजी किती । राहियेला तें सांगा जी ॥५॥स्त्रिया तयाप्रति कोण । कथनीय तेंही अन्य ॥६॥राव विनवी हे मुने । सांगा वासुदेव म्हणे ॥७॥४उत्कंठित माझें मुनिश्रेष्ठा, चित्त । श्रीकृष्णचरित्र ऐकावया ॥१॥यद्यपि मी मुने, क्षुधातृषाव्याप्त । कथामृत तृप्त करी परी ॥२॥मुखारविंदीचा मकरंद तुझ्या । माझी क्षुधा तृषा निवारील ॥३॥निवेदिती सूत शौनकासी शुक । ज्ञानी महाभक्त नृपप्रश्नें ॥४॥संतोष पावूनि, मुनि गौरविती । कौतुक करिती मनीं बहु ॥५॥सकलही कलिदोषनिवारक । श्रीकृष्णचरित्र आरंभिती ॥६॥वासुदेव म्हणे कृष्णकथागंगा । भाविक हो, आतां ऐका प्रेमें ॥७॥५परीक्षिताची ते उत्कंठा पाहूनि । आनंदित मनीं म्हणती राया ॥१॥कथा ही वक्त्यातें, पृच्छका, श्रोत्यातें । बहु पुण्यदा ते सकलांप्रति ॥२॥गंगास्नानें गति तेचि तयांप्रति । लाभे बैसूनीचि निजस्थानीं ॥३॥निवेदिती शुक देऊनियां चित्त । श्रीकृष्णचरित्र कथितों ऐकें ॥४॥वासुदेव म्हणे जनीं भाग्यवंत । श्रीकृष्णचरित्र ऐकेल जो ॥५॥६पृथ्वीवरी दैत्य जाहले उन्मत्त । गांजिती प्रजेस सत्तामदें ॥१॥त्राहि त्राहि देवा, बोलती सकळ । भूमीतेंही भार न सहे त्यांचा ॥२॥गोरुपें ती खिन्न होऊनि रुदन - । करीत, भेटून ब्रह्मदेवा ॥३॥आर्तस्वरें दु:ख आपुलें निवेदी । क्षीरसिंधूतटीं जाती सर्व ॥४॥इंद्र शिवादिक सकलही देव । प्रार्थिती सदय देवदेवा ॥५॥वासुदेव म्हणे ब्रह्मा नभोवाणी । ऐकतसे ध्यानीं असतां मग्न ॥६॥७देवांसवे भूमीप्रति । कथी आशय विरंची ॥१॥ज्ञात पूर्वीच प्रभूतें । दु:ख सकळ भूमीचें ॥२।\अवतार तो घेईल । धन्य वसुदेव होईल ॥३॥येवो यादवांच्या कुळीं । सकळ देवता मंडळी ॥४॥श्रीहरीच्या संतोषार्थ । जन्म अप्सरा घेवोत ॥५॥ज्येष्ठ बांधव तयाचा । शेष होईल तो साचा ॥६॥वासुदेव मायाशक्ति । म्हणे यशोदेच्या पोटीं ॥७॥८आज्ञा करुनि देवांसी । धीर देऊनि पृथ्वीसी ॥१॥सत्यलोकीं जाई ब्रह्मा । हर्ष वाटला सज्जनां ॥२॥भूलोकांत वसुदेव - । देवकीचा तैं विवाह ॥३॥मथुरेसी शूरसेन । राजा राज्य करी जाण ॥४॥यादवांचा तो प्रमुख । वसुदेव त्याचा सुत ॥५॥उग्रसेन कन्या त्यासी । अर्पी आनंदें देवकी ॥६॥वासुदेव म्हणे कंस । भगिनीविवाहें हर्षित ॥७॥९विवाहसमयीं कंस भगिनीतोषार्थ ॥सुवर्णरथीं त्या करी स्वयेंचि सारथ्य ॥१॥परिवार बहुतचि सन्निध तयाच्या ।चार शत सशृंगार राव देई गजां ॥२॥पंचदश सहस्त्र ते अश्व तेंवी रथ ॥अष्टादश शत, दासी तेंवी दोन शत ॥३॥आंदण कन्येसी ऐसें देई उग्रसेन ॥शंख दुंदुभींच्या नादें कोंदलें गगन ॥४॥अश्व हांकितां रथाचे कंस, नभोवाणी ॥‘आठवा वधील हिचा गर्भ कंसालागीं’ ॥५॥वासुदेव म्हणे मोद होईल तोचि क्रोध ॥पामर जनांचा जनीं होतां स्वार्थभंग ॥६॥१०ऐकूनि ते नभोवाणी कुलाधम । धांवला घेऊन खड्ग कंस ॥१॥भगिनीतें, वेणी धरुनि ओढिलें । कृत्य तें पाहिलें वसुदेवानें ॥२॥तदा सांत्वनार्थ बोले वसुदेव । कंसा, त्वद्गौरव करिती वीर ॥३॥भोजकुलकीर्ति वाढवाया नित्य । करिती प्रयास अहर्निश ॥४॥ऐसें असूनि हे स्त्री, त्यांत भगिनी । मंगल समयीं वधिसी केंवी ॥५॥वासुदेव म्हणे वसुदेव कथी । जीव जन्मे त्यासी मृत्यु जनीं ॥६॥११जन्मला जो तया अद्य वा शताब्दीं । निश्चयें प्राप्तचि मरणें असे ॥१॥कर्मपराधीन योजी देह अन्य । मग पूर्व प्राण सोडी प्राणी ॥२॥पुढील चरणीं भार टाकूनियां । जेंवी उचलावा प्रथम पाद ॥३॥तृणजलूका वा अग्रभागें तृण । धरी तदा जाण पृष्ठ सोडी ॥४॥योजिल्यांवाचूनि वा अग्रभागें तृण । धरी तदा जाण पृष्ठ सोडी ॥५॥योजिल्यांवाचूनि तेंवी अन्य देह । सोडीनाचि देह पूर्व देही ॥६॥राव किंवा देव वर्णन ऐकूनि । चिंतितां तो मनीं, स्वप्नीं येई ॥७॥द्वितीयक्षणीं तो मीचि ऐसा भाव । म्हणे वासुदेव तेंवी देह ॥८॥१२कर्मासम देव मनुष्यादि देह । अभिमानी जीव माझा मानी ॥१॥त्याचि देहासवें पावूनियां जन्म । होई विस्मरण पूर्वीचें त्या ॥२॥प्रतिबिंब हाले उदक हालतां । देहदु:खें तैसा जीव दु:खी ॥३॥तात्पर्य न कोणा मृत्यु टळे कंसा । वासनेसम त्या अन्य देह ॥४॥प्राप्तदेहासम घडे त्याचें कर्म । अन्यनाशयत्न व्यर्थ तेणें ॥५॥वधितां एकासी सर्व भय जाई । कदा होत नाहीं ऐसें जगीं ॥६॥हत्येस्तव तेंवी घोर यमदंड । निश्चयानें प्राप्त भोगणें तो ॥७॥वासुदेव म्हणे वसुदेव प्रार्थी । यास्तव भगिनीसी वधूं नको ॥८॥१३यापरी बहुत करुनिही बोध । दुर्जनाचें चित्त द्रवलें नाहीं ॥१॥राक्षसरुपा त्या भगिनीची दया । लवही त्या ठाया न येईचि ॥२॥तदा वसुदेव चिंती निज मनीं । टाळावा जीवांनीं मृत्यु यत्नें ॥३॥प्रयत्नेंही मृत्यु टळला न जरी । मानवासी तरी दोष नसे ॥४॥पुढती चिंतूनि कांहीं मनामाजी । बोलला कंसासी वसुदेव ॥५॥म्हणे अपत्यें मी अर्पीन तुजसी । अंतरीं मानिसी भय ज्यांचें ॥६॥वासुदेव म्हणे ऐकूनि तें कंस । जाहला निवृत्त अत्यानंदें ॥७॥१४ऐका वसुदेवें चिंतियेलें काय । कदा भवितव्य न टळे कोणा ॥१॥अद्य जें मरण न्यावें उद्यांवरी । अगाधचि करी लीला प्रभु ॥२॥कालक्रमणें या इष्टही घडेल । अथवा टळेल दोष तरी ॥३॥जळेल वांचेल वणव्यांत वृक्ष । न कळे कांहीच कदा कोणा ॥४॥समीपस्थ वांचे दुरस्थही जळे । मृत्यूचें न कळे तेंवी कांहीं ॥५॥यास्तव अपत्यें यासी अर्पूनियां । अद्य वांचवावा कांताप्राण ॥६॥वासुदेव म्हणे चिंतूनियां ऐसें । कथितां कंसांतें, कार्य होई ॥७॥१५घोर प्रसंग तो टळतां यापरी । आपुलाल्या स्थळीं सकल जाती ॥१॥पुढती समयीं प्रतिवर्षी एक । ऐसे पुत्र अष्ट, नवम कन्या ॥२॥देवकीसी ऐसीं जाहलीं अपत्यें । अर्पितां कंसातें प्रथम पुत्र ॥३॥विस्मित तैं कंसस सद्गद होऊनि । म्हणे यापासूनि मज न भय ॥४॥अष्टम तो तव पुत्र देईं मज । अन्य तुझे तुज सौख्यदचि ॥५॥ऐकूनियां शब्द वसुदेव जाई । विश्वास लवही न मानितां ॥६॥वासुदेव म्हणे दुष्करही कर्म । करिती सज्जन सहजपणें ॥७॥१६परीक्षितीलागीं शुक । म्हणती यादव ते देव ॥१॥पाळिताती कंसाआज्ञा । परी कंसवध यत्ना - ॥२॥करिती, प्रयत्नेंकरुनि । मूढ कंस तें न जाणी ॥३॥परी एकदां नारद । कथिती सर्व हें कंसास ॥४॥कंस सावध तैं होई । सर्व वृत्त ध्यानीं घेई ॥५॥देवकीच्या उदरीं हरी । म्हणे येईल सत्वरी ॥६॥वसुदेव - देवकीसी । कंस ठेवी बंदिवासीं ॥७॥वासुदेव म्हणे दुष्ट । छळिती ऐसे सज्जनांस ॥८॥१७इंद्रियांची तृप्ति हेंचि जयां सौख्य । कर्तव्य न त्यांस वाटे अन्य ॥१॥माता पिता बंधु आप्तही न त्यांसी । सुखेंचि तयासी वधितील ते ॥२॥पुढती सकळ देवकीचे पुत्र । मानूनि विष्णूच वधी तयां ॥३॥कालनेमि मीचि मानूनि पूर्वीचा । यादवविरोधा करुं लागे ॥४॥अंतीं यदु-भोज यादवांचा पति । प्रत्यक्ष पित्यासी करी बंदी ॥५॥वासुदेव म्हणे मनसोक्त ऐसी । क्रिया दुर्जनाची होई जनीं ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 09, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP