मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय १० वा पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय १० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय १० वा Translation - भाषांतर ११०राव म्हणे मुने, कुबेरपुत्रांचें । वृत्त तें कथावें सकल मज ॥१॥नारदांसी क्रोध येई ऐसें काय । केलें दुष्ट कार्य कथा मज ॥२॥निवेदिती शुक कुबेराचे पुत्र । शंकराचे दूत होते परी ॥३॥सेवा शंकराची त्यागिली तयांनीं । प्राशूनि वारुणि धुंद झाले ॥४॥कैलासीं पुष्करोद्यानीं ते अप्सरा - । घेऊनियां, क्रीडा करिती जनीं ॥५॥वासुदेव म्हणे दैवयोगें तेथ । पातले नारद तयावेळीं ॥६॥१११पाहूनि मुनींसी लाजल्या अप्सरा । सत्वरी स्ववस्त्रां परिधानिती ॥१॥विवस्त्रचि धुंद पुत्र कुबेराचे । लवही मुनींतें न मानिती ॥२॥चिंतिती ते मनीं वित्त, विद्या, यश । करी मतिभ्रष्ट सत्कुळही ॥३॥परी संपत्तीचा मद सर्वश्रेष्ठ । सुरा, स्त्री तैं द्यूत संपत्तीनें ॥४॥वित्तधुंद मानी देह हा अमर । पशुवध क्रूरपणें करी ॥५॥वासुदेव म्हणे आंवरेना मना । धुंदी येतां जाणा संपत्तीची ॥६॥११२चिंती न मदांध, देह होतांचि निष्प्राण ।प्रेतचि, असो तो कोणी राव वा ब्राह्मण ॥१॥श्वान जंबुकें भक्षितां होईल ते विष्टा ।होईल रक्षाचि कोणी अथवा जाळितां ॥२॥तैसेंचि राहतां कृमी होती तयांत ॥जाणूनीही मूढ लेखी प्राणीमात्रां तुच्छ ॥३॥हिताहितज्ञान मूढा नसे द्वेषभावें ॥स्पष्टचि तयानें अंधतमामाजी जावें ॥४॥वासुदेव म्हणे देह तरी हा कोणाचा ॥चिंती न हें अज्ञ परी चिंती तेंचि ज्ञाता ॥५॥११३स्वाधीन आपुल्या म्हणूनि आपुला । अथवा अर्पावा अन्नदात्या ॥१॥पितृरोतोद्भव पित्याचाचि होई, उदरीं वाढवी माता तया ॥२॥पुत्रिकाधर्मे तो पितामहाचा कीं । बलवंत योजी सेवेसी त्या ॥३॥धनिकही कोणी घेईल धनानें । भस्म करी तेणें अग्नीचा कीं ॥४॥श्वान सूकरही भक्षिती तयातें । स्वामित्व तयांचें म्हणणें काय ॥५॥ऐसा भूतांचा हा विकार एथेंचि । ममता तयाची धरी मूढ ॥६॥वासुदेव म्हणे दारिद्र्यचि मूढा । औषध मुनींचा निर्णय हा ॥७॥११४समदृष्टि लाभे दारिद्र्यें नरासी । परदु:ख त्यासी समजूं लागे ॥१॥सलतां कंटक होती जैं यातना । पाहूनि त्या अन्या समजे दु:ख ॥२॥दु:ख न कोणातें होवो म्हणे ऐसें । दु:ख दारिद्र्याचें भोगितो जो ॥३॥यथाशक्ति साह्य होई तो अन्यासी । सांत्वन वा इच्छी असामर्थ्ये ॥४॥संपन्न न होई दु:खी अन्य दु:खें । दारिद्य्र मोक्षातें उपकारक ॥५॥वासुदेव म्हणे उन्मत्तता त्यासी । येई न कदापि विद्या तपें ॥६॥११५प्रारब्धें जें दु:ख भोगिती दरिद्री । जाणावें तपचि तयांचें तें ॥१॥क्षुधाव्याकुळ तो अनायासे क्षीण । इंद्रियसंयम सहज तेणें ॥२॥धनवंतासम पातकांची संधि । लाभे न, त्या शुद्धि स्वाभाविक ॥३॥साधुसंगतीचा लाभही त्या घडे । विवेकाचे धडे सत्संगानें ॥४॥ऐशा मार्गे त्याच्या वासना विनष्ट । होऊनियां मोक्षलाभ घडे ॥५॥ऐश्वर्यमदांधां सज्जनसंगति । लाभे न कदापि ध्यानीं असो ॥६॥वासुदेव म्हणे निस्पृह सज्जन । मदांधांसी काम काय त्यांचें ॥७॥११६चिंतूनियां ऐसें कुबेरपुत्रांसी । नारद बोलती परिसा काय ॥१॥द्रव्यांध हो, तुम्हीं मदिरा स्त्रियांसी । होऊनि वश ही करितां कृति ॥२॥कुबेराचे पुत्र असूनि न भान । पादप होऊन भोगा क्लेश ॥३॥स्मरण तुम्हांसी राहील तेथेंही । उद्धरील पाहीं कृष्ण तुम्हां ॥४॥बोलूनियां ऐसें बदरिकावनीं । नारद निघूनि जाती तदा ॥५॥कुबेरपुत्र तैं होऊनियां वृक्ष । वास गोकुळांत करिती सौख्यें ॥६॥वासुदेव म्हणे वृक्ष ते अर्जुन । जुळेचि होऊनि राहियेले ॥७॥११७निवेदिती शुक उखळासी बद्ध । वृक्षांच्या सन्निध येई कृष्ण ॥१॥ओढीत ओढीत उखलासी जाई । अडकला पाहीं उखळ वृक्षीं ॥२॥ओढितां जोरानें उन्मळले वृक्ष । येई पूर्वरुप ‘गुह्यका’ तैं ॥३॥दिव्य पुरुष ते वंदिती कृष्णासी । जोडूनि करांसी करिती स्तुति ॥४॥गोपालबाल तूं नसूनि जगाचा । एकमेव त्राता नारायणा ॥५॥जड-चेतन हें तुझेंचि स्वरुप । नियंताही तूंच विश्वासी या ॥६॥वासुदेव म्हणे आद्यंतरहिता । कालावरी सत्ता एक तव ॥७॥११८गुणमयी पंचभूतात्मक शक्ति । प्रकृतीही तूंचि साक्षिरुपा ॥१॥ऐसा तूं सर्वत्र असूनि बुद्धीसी । न होई कदापि ज्ञान तव ॥२॥देहादिबंधनें मोहपाशबद्ध । ओळखी न तुज देवा, जीव ॥३॥ऐश्वर्यसंपन्ना हे स्वयंप्रकाशा । पुत्र वसुदेवाचा जाहलासी ॥४॥प्रभावें तुझ्याचि जाणिलें हें आम्हीं । देवा, तूंचि स्वामी पुरुषार्थाचा ॥५॥अज्ञउद्धारार्थ सगुण झालासी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥६॥११९परममंगला, कल्याणकारका । यादवपालका शांतिरुपा ॥१॥वारंवार आम्हीं वंदितों तुजसी । कृपा नारदाची आम्हांवरी ॥२॥तेणेंचि दर्शन लाभलें हें आम्हां । जावया स्वस्थाना आज्ञा देईं ॥३॥दुर्बुद्धि न आतां होवो पूर्वीसम । तुझेंचि वर्णन करो वाणी ॥४॥कथाश्रवण हें करोत श्रवण । कर पूजामग्न होवोत हे ॥५॥मन मग्न होवो चरणस्मरणीं । सज्जनदर्शनीं दृष्टि जडो ॥६॥वास्तव्यस्थान हें देवा, तव विश्व । मस्तक हें नत होवो तेथें ॥७॥वासुदेव म्हणे ऐकूनि ते स्तुति । हांसूनि श्रीपति वदला तयां ॥८॥१२०उन्मादें तुमच्या शापिलें नारदें । योग्यचि परी तें घडलें कर्म ॥१॥सूर्यदर्शनें जै अंध:कारनाश । दर्शनें तैं दोष हरती सर्व ॥२॥साधूंच्या दर्शनें जीवांप्रति मुक्ति । उपजली भक्ति तुम्हां आतां ॥३॥यास्तव सुखानें जाऊनि स्वस्थानीं । रमावें भजनीं भक्तिभावें ॥४॥तेणें तुम्हां मुक्ति निश्चयें लाभेल । ऐकूनि कुबेरपुत्र धाले ॥५॥वासुदेव म्हणे उत्तर दिशेसी । वंदूनि प्रभूसी गेले दोघे ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 09, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP