मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय ३३ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय ३३ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय ३३ वा Translation - भाषांतर १९२मैत्रेय क्षत्त्यासी म्हणती हे सांख्य - । शात्रप्रवर्तक कपिलमुनि ॥१॥ज्ञानलाभें माता ईश्वरस्वरुपी । स्तवी स्वपुत्रासी परमानंदें ॥२॥देवा, ब्रह्मा, विष्णु, महेश्वर तूंचि । उदकनिवासी नारायण ॥३॥विश्वविनायका उदरांत माझ्या । राहिलासी कैसा नवल वाटे ॥४॥अथवा नवल नसेचि हें तुज । उदरांत विश्व सांठवूनि - ॥५॥वटपत्रशायी जाहलासी बाळ । भक्तांस्तव खेळ करिसी ऐसा ॥६॥वासुदेव म्हणे दुष्टनिर्दाळण । भक्तांचें पालन करी देव ॥७॥१९३ज्ञानबोधार्थ हा अवतार तुझा । येई कृतार्थता मजलागीं ॥१॥चांडाळही पुण्यवंत तुझ्या नामें । प्रत्यक्ष दर्शनें कां न लाभ ॥२॥सर्व साधनांचें फल तुझ्य नांएं । तुझेंचि करणें ध्यान, योग्य ॥३॥प्ररब्रह्म तूंचि, तूंचि वेदगर्भ । असो नमस्कार तुजसी माझा ॥४॥मातेसी कपिल म्हणती हा मार्ग । आचरीं सुलभ मोक्षास्तव ॥५॥क्रमितां हा मार्ग उद्धरती जन । संसारभ्रमण इतरांलागीं ॥६॥१९४मैत्रेय बोलती क्षत्त्यासी या रीति । कपिल मातेसी करुनि बोध ॥१॥वंदूनियां आज्ञा घेऊनि तियेची । इच्छित स्थलासी निघूनि गेले ॥२॥सरस्वतीतीरीं राही देवहूति । नित्य साधनींती रमूनि जाई ॥३॥कृष्णकुंतल ते जाहले पिंगट । तेंवी जटारुप स्नानें होती ॥४॥गोंडस शरीर कृशत्व पावलें । परिधानी वल्कलें त्यजूनि वस्त्रें ॥५॥पतिसामर्थ्यानें विषय जे भोगी । मानूनि ते त्यागी विषरुप ॥६॥वासुदेव म्हणे पतीचा विरह । पाहूनि सत्पुत्र विसरे सती ॥७॥१९५ज्ञानलाभेंही तें पुत्राचें स्मरण । होतांचि उद्विग्न होई मनीं ॥१॥ध्यानधारणेचा करुनि अभ्यास । ईशचिंतनांत नित्य रमे ॥२॥कपिलोक्त मार्गे अवयवध्यान । करुनियां मन स्थिर करी ॥३॥समाधि साधूनि अहंकार नष्ट । झाला, देहभाव स्पर्शेचि ना ॥४॥अलौकिक गुप्त तेज अंगावरी । ऐक्यता पावली परब्रह्मीं ॥५॥सिद्धपूर नामें स्थान तें प्रसिद्ध । देवहूति मुक्त जया स्थानीं ॥६॥वासुदेव म्हणे सरितापदासी । पावे देवहूति तपोबळें ॥७॥१९६सरित्तटाकीं त्या बहु सिद्ध येती । तत्काळ त्यां सिद्धी तयास्थानीं ॥१॥असो, ईशान्येसी गेले कपिलमुनि । सिद्ध गंधर्वांनीं स्तविलें तयां ॥२॥सांख्यशास्त्रज्ञानीं गौरविलें त्यांसी । मुनि त्या ठायासी ध्यानमग्न ॥३॥विदुरा, संवाद कथिला हा तुज । गुप्त कपिलोक्त शुद्धमार्ग ॥४॥श्रवण जो याचें करील सर्वदा । चित्त एकाग्रता साधूनियां ॥५॥गरुडध्वज त्या भगवंत जोडे । ऐशा भक्तियोगें सहजपणें ॥६॥वासुदेव म्हणे तृतीय हा स्कंध । पठणें मुकुंद तोष पावे ॥७॥इतिश्री वासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंध ३ रा समाप्त. ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP