मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय १ ला स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय १ ला सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय १ ला Translation - भाषांतर १परीक्षितीलागीं बोलताती शुक । विदुरें मैत्रेयास पुशिलें हेंचि ॥१॥दुर्योधनाप्रति अव्हेरुनि कृष्ण । विदुरसदन स्वीकारी तो ॥२॥परमपावन सदन तें ऐसें । राव तैं मुनीतें प्रश्न करी ॥३॥कदा कोण्या ठाईं मैत्रेय विदुर । संभाषण काय करिते झाले ॥४॥सूत म्हणे ऐसा जिज्ञासूचा प्रश्न । शुकासी ऐकून मोद झाला ॥५॥वासुदेव म्हणे ऐकावी शुकोक्ति । भवबंधमुक्ति जेणें घडे ॥६॥२केला गृहत्याग विदुरें तयासी । कारणें असती बहुविध ॥१॥धृतराष्ट्रें दुष्ट पुत्रांसी पाळिलें । क्रौर्यें वागविलें पांडवांसी ॥२॥जगद्गुरु जगन्नाथाचाही बोध । अमृतस्वरुप रुचला नाहीं ॥३॥लेशही पुण्यांश राहिला न जरी । इच्छा हेचि तरी होई नरा ॥४॥अधिकार थोर होता विदुराचा । अंधासी तयाचा बोध रुचे ॥५॥यास्तव तयासी पुशितां विदुरोक्ति । प्रसिद्ध ते नीति विदुराची ॥६॥वासुदेव म्हणे विदुरोक्त सार । द्वैपायनपुत्र निवेदिती ॥७॥३अनंत अपराध साहिले धर्मानें । न्याय्य हक्कदानें तोषवीं त्या ॥१॥भीमक्रोधसर्प फूत्कार सोडितो । दंशासी शोधितो संधी आतां ॥२॥आहुती त्या अग्नीमाजी त्वत्पुत्रांची । पडेल कदा ती न कळे कोणा ॥३॥द्वारकानिवासी हा पुत्र तुझा राया । विभाग पांडवां देईं त्यांचा ॥५॥कृष्णद्वेषें दुर्योधनासम, राजा । विनाशचि तुझा नाहींतरी ॥६॥वासुदेव म्हणे ज्ञात्याचा सद्बोध । होतां बुद्धिभ्रंश रुचेचिना ॥७॥४आरक्तनयन बोले दुर्योधन । दासीपुत्रा कोण पुशितो तुज ॥१॥कृतघ्न हा अन्न भक्षूनि आमुचें । आमुच्या वैर्यातें साह्य करी ॥२॥नगराबाहेरी घालवा याप्रति । ऐकतां विदुरासी दु:ख बहु ॥३॥राजद्वारीं धेनु ठेवूनि यात्रेसी । निघाला हरीची समजे इच्छा ॥४॥नररत्नें ऐसीं लाभती पुण्यानें । लाथाडी दुर्दैवें दुराचारी ॥५॥वासुदेव म्हणे कामधेनूप्रती । लत्ता जे हाणिती मूर्खचि ते ॥६॥५सरोवरें तीर्थे नद्या, उपवनें । विदुर श्रद्धेनें हिंडतसे ॥१॥मूर्तीदर्शनें तो प्रेमानें घेऊन । व्रतस्थ राहून यात्रा करी ॥२॥प्रभासीं तयाच्या भारतीय युद्ध । वृत्त तें समस्त कानीं आलें ॥३॥ऐकूनि व्याकुळचित्तें तो निघाला । तीरावरी आला यमुनेच्या ॥४॥नीतिविशारद बृहस्पतिशिष्य । पाहिला उद्धव कृष्णप्रिय ॥५॥प्रेमालिंगन त्या देऊनि विदुर । आप्तेष्टकुशल प्रश्न करी ॥६॥वासुदेव म्हणे सज्जनाची भेटी । हर्षकारी मोठी सज्जनातें ॥७॥६उद्धवा, भूमाहरणार्थ कृष्ण । अवतार घेऊन पातलासे ॥१॥रायासवें क्षेम असे कीं तयाचें । क्षेम वसुदेवाचें कथीं मज ॥२॥वीर तो प्रद्युम्न तेंवी उग्रसेन । सांबादींचे क्षेम निवेदावें ॥३॥सात्यकी-अक्रूरकुशल कथावें । ऐकवून द्यावें समाधान ॥४॥अदितिसम ती देवकी भाग्याची । कुशल असे कीं सांगें मज ॥५॥अनिरुद्ध, गद, भानु तैं हृदीक । सुखी ते समस्त असती कीं रे ॥६॥वासुदेव म्हणे विदुर तो श्रेष्ठ । प्रश्न करी स्पष्ट पुढती ऐका ॥७॥७उत्कर्षे जयाच्या दुर्योधन क्रुद्ध । धर्म तो आनंद पावतो कीं ॥१॥क्रोधकुंडीं शत्रु आहुती अर्पूनि । तोषला कीं मनीं भीम सांगें ॥२॥धनुर्धारी पार्थ, नकुल, सहदेव । तेंवी कुंतीमाय क्षेम कथीं ॥३॥अंधअध:पात पाहूनियां खेद । वाटे अंतरांत काय करुं ॥४॥मृतबांधवांर्थ खेद न तयासी । आस्था तेंवी माझी नसे तया ॥५॥श्रीकृष्णस्वरुप चिंतूनियां मनीं । हिंडतों अवनी तीर्थक्षेत्रें ॥६॥वासुदेव म्हणे गुप्तरुपें क्षत्ता । पुण्यमार्ग ऐसा कंठीतसे ॥७॥८दु:खप्रसंग हे भोगितां पामरां । विस्मर अंतरा वाटे बहु ॥१॥परी आत्मज्ञानें संतुष्ट मी सदा । कदाही कोणाचा न गणीं दोष ॥२॥विद्या - धन - कुळें मत्त दुर्जनांचा । भार नित्य साचा भूमीप्रति ॥३॥साधुसंरक्षणहेतु अंतरांत । धरुनि हें युद्ध आरंभिलें ॥४॥त्रिगुणातीत तो कृष्ण परात्पर । पातला उद्धार करावया ॥५॥वेदाज्ञा पाळूनि येती जे शरण । तयांचें रक्षण करी प्रेमें ॥६॥वासुदेव म्हणे ऐशा श्रीहरीचें । वृत्त उद्धवातें पुशी क्षत्ता ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP