मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय ४ था स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय ४ था सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय ४ था Translation - भाषांतर २०पुढती यादव भोजन करुनि । मदिरा प्राशूनि धुंद झाले ॥१॥मदिराधुंद ते करितां प्रलाप । कलहकारक वदले वाणी ॥२॥परस्पराघात करुनि समस्त । दग्ध वेणुवृंद तैसे नष्ट ॥३॥ऐसा निर्निमित्त होऊनि कलह । नष्ट झाले सर्व यादववीर ॥४॥वासुदेव म्हणे माया ईश्वराची । पार न कोणासी लागे तिचा ॥५॥२१पाहूनि तें सर्व कृष्ण लीलाधारी । सरस्वतीतीरीं निघूनि जाई ॥१॥पवित्र त्या जळें करी आचमन । अश्वत्थ पाहून बसला खालीं ॥२॥बदरिकाश्रमीं जावें ऐसें मज । कथिलें पूर्वीच श्रीहरीनें ॥३॥परी तो वियोग साहवे न मज । गेलों मागोमाग तयास्थानीं ॥४॥चतुर्भुज पीतवसन तैं हरी । शोभला मुरारी पूर्वींहुनि ॥५॥वामपादावरी दक्षिण चरण । अश्वत्था टेंकून बसला होता ॥६॥स्वानन्दनिमग्न होता तदा देव । ध्यान वासुदेव करी त्याचें ॥७॥२२इतुक्यांत गुरुबन्धु श्रीव्यासांचे । मैत्रेय, भक्तीचें भवन येती ॥१॥कृष्णभगवान बोलला तैं मज । दुर्मीळ तें तुज देतों आतां ॥२॥अष्टवसूंमाजी उद्धवा, तूं एक । पूर्वजन्मीं तप केलें बहु ॥३॥एकान्तीं तूं ऐशा समयीं आलासी । जन्म-मरणभीति चुकली तेणें ॥४॥पुरा जें ब्रह्मयासी कथियेलें ज्ञान । निवेदितों जाण तेंचि तुज ॥५॥भागवत तया बोलताती ज्ञाते । कथूनियां मातें अवलोकिलें ॥६॥वासुदेव म्हणे होतां कृपादृष्टि । रोमांच ठाकती उद्धवातें ॥७॥२३कांहीं काळ ऐसा होतों रुद्धकंठ । विदुरा, प्रभूस वदलों मग ॥१॥देवा त्वद्भक्तांसी लाभती पुरुषार्थ । परी देईं मज चरणसेवा ॥२॥असूनि निरिच्छ केलींस तूं कर्मे । अजन्माचि जन्मे भक्तांस्तव ॥३॥काळाच्याही काळा भयें लपलासी । संसार केलासी आत्मारामा ॥४॥ऐशा या विरुद्ध क्रियांसी पाहून । होती मोहमग्न परम ज्ञाते ॥५॥सर्वज्ञा, प्रसंगीं अग्रबुद्धासम । पुशिलेंसी ज्ञान मजलागींही ॥६॥आश्चर्य तयाचें वाटे मज नित्य । करीं आतां बोध मजसी कृष्णा ॥७॥वासुदेव म्हणे उद्धववचनें । ज्ञान नारायणें दिधलें त्यासी ॥८॥२४प्रदक्षिणा तया प्रभु दामोदरा । घालूनि विदुरा, गेलों सुखें ॥१॥वियोग तयाचा साहवे न आतां । जातों बदरिका आश्रमासी ॥२॥कल्पान्तपर्यंत नरनारायण । करितील जाण तप तेथें ॥३॥ऐकूनि विदुर आंवरुनि दु:ख । म्हणे तें कृष्णोक्त ज्ञान कथीं ॥४॥उद्धव तयासी म्हणे त्वत्स्मरण । झालें होतें जाण श्रीकृष्णासी ॥५॥मैत्रेयांनीं बोध करावा हा तुज । बोलला गोविंद ऐसें तयां ॥६॥पुढती उद्धव बदरिकाश्रमीं । गेला आंवरुनि दु:खभार ॥७॥वासुदेव म्हणे परीक्षितप्रश्न । शुकासी सुजाण करी ऐका ॥८॥२५मुने, उद्धवचि राहिला तो कैसा । यादवकुळाचा नाश होतां ॥१॥मुनि बोलले तैं राया, उद्धवासी । आज्ञा श्रीहरीची संरक्षक ॥२॥ज्ञानसंरक्षणा योग्य हा उद्धव । जाणूनि केशव संरक्षी त्या ॥३॥उद्धवगमनें स्मरुनि वृत्तान्त । होई खिन्नचित्त विदुर बहु ॥४॥आठवण माझी केली नारायणें । द्रवला या स्मरणें चित्तीं क्षता ॥५॥वासुदेव म्हणे मैत्रेयआश्रमीं । गेला तो निघूनि गंगाद्वारीं ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP