स्कंध ३ रा - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३१
स्तवनें त्या देव जाहला प्रसन्न । केलें प्रवेशून नवल तत्त्वीं ॥१॥
क्रियासामर्थ्यें त्या ऐक्य तीं पावलीं । समर्थ तैं झालीं उत्पत्तीतें ॥२॥
विराट स्वरुप पावलीं तीं सर्व । जीवांचाही जीव तोचि असे ॥३॥
ज्ञान क्रिया - भोक्तृत्व या शक्ति तीन । भाग भिन्न भिन्न पडले तेणें ॥४॥
हृदय तें होई ज्ञानशक्तिकार्य । क्रियाशक्तिकार्य प्राण दश ॥५॥
अध्यात्म, अधिदैव, अधिभूत ऐसें । भोक्तृत्वशक्तीचें कार्य असे ॥६॥
वासुदेव म्हणे इंद्रियें, देवता । विषय हा ऐसा अर्थ त्याचा ॥७॥

३२
देवतास्तवन आठवूनि ईश । विराट देहांत योजी तयां ॥१॥
मुखनासिकादि स्थानीं त्यां योजून । पुढती निर्माण करी सृष्टी ॥२॥
वेद ब्राह्मण ते होती मुखीं त्याच्या । बाहू क्षत्रियांचा मूळाधार ॥३॥
विष्णूचे ते अंश सकळां रक्षिती । वैश्य शूद्र होती याचपरी ॥४॥
काल, कर्म, स्वभावदिशक्तियुक्त । वर्णी भगवंत ऐसा कोण ॥५॥
वाणीसुद्ध्यर्थ हें करितों वर्णन । करा संकीर्तन म्हणती साधु ॥६॥
अनंत सामर्थ्य आपुल्या मायेचें । न कळेचि साचें ईशातींही ॥७॥
वासुदेव म्हणे ऐशा परमेश्वरा । जोडिताती करा मुनिश्रेष्ठ ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP