मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय १३ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय १३ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय १३ वा Translation - भाषांतर ६५मैत्रेयासी बोलला विदुर । मनूचें चरित्र प्रेमें कथा ॥१॥भक्तचरित्रें ती ऐकावीं सप्रेम । ज्ञानफल जाण हेचि वाटे ॥२॥मुनि म्हणे मनु प्रार्थी विरंचीसी । आज्ञापीं मजसी सेवा कांहीं ॥३॥ब्रह्मा म्हणे पितृआज्ञेचें पालन । सेवा हेचि जाण, प्रजा निर्मी ॥४॥सद्धर्मे पालन करावें पृथ्वीचें । यत्नें ईश्वरातें तोषवावे ॥५॥मनु म्हणे आज्ञा मान्य, तरी ताता । उद्धार भूमीचा प्रथम व्हावा ॥६॥जलमग्न पृथ्वी पाहूनियां ब्रह्मा । चिंती पूर्णकामा वासुदेवा ॥७॥वासुदेव म्हणे नासापुंटातून । वराह होऊन प्रगटे हरी ॥८॥६६पाहतां पाहतां वाढला वराह । ब्रह्मा म्हणे देव प्रगटला हा ॥१॥पर्वताकार तो होऊनि गर्जला । पाहूनि तोषला ब्रह्मदेव ॥२॥ऊर्ध्वलोकस्थित मुनींनीं प्रार्थिलें । रुप तें शोभलें वराहाचें ॥३॥उभारिलें पुच्छ थरारती केश । विजेसम अंग हालतसे ॥४॥क्षुराघातें मेघ होती अस्ताव्यस्त । पसरे दिव्यतेज दंष्ट्रेचें त्या ॥५॥भूमिशोधास्तव उदक हुंगित । प्रवेशे जळांत खवळे सिंधु ॥६॥लाटांवरी लाटा उसळती तेचि । सिंधु कर जोडी ऐसें वाटे ॥७॥वासुदेव म्हणे सिंधूच्या तळाशीं । पृथ्वी वराहासी दिसली तदा ॥८॥६७अतर्क्यसामर्थ्य वराह तो भूमी । उद्धरी, घेऊनि दंष्ट्रेवरी ॥१॥इतुक्यांत दैत्य हिरण्याक्ष धांवे । चिंती अडवावें वराहासी ॥२॥वराह तैं क्रोधें सोडी सुदर्शन । घेई दैत्यप्राण तत्काळचि ॥३॥आरक्त मृत्तिका उधळूनि गज । शोभे तैं वराह शोभा पावे ॥४॥शुभ्र दंतावरी घेउबियां पृथ्वी । काढिली बाहेरी लीलामात्रें ॥५॥वासुदेव म्हणे विरंची प्रभृति । वेदसूक्तें त्यासी स्तविती तदा ॥६॥६८जयजयकार असो अपार्जिता तव । घेई नमस्कार आमुचा हा ॥१॥रोमरंध्रीं तुझ्या सर्व यज्ञ लीन । पृथ्वीचें तारण केलेंसी त्वां ॥२॥आदि वराहा नमस्कार तुज । पातक्यांसी रुप दुर्लभ हें ॥३॥छेंद, अंग, दर्भ केश, दृष्टि घृत । तूंचि यज्ञरुप विश्वेश्वरा ॥४॥मुखनासिकादि सर्व अवयव । यज्ञांगें सकळ देवदेवा ॥५॥मत्त मतंगज कमलिनीलागीं । उचली, हे तैसी भूमी तुज ॥६॥वासुदेव म्हणे गिरिशृंगीं मेघ । तैसी दंष्ट्रास्थित पृथ्वी शोभे ॥७॥६९देवा, इष्टमार्गे करीं भूस्थापना । स्थावरजंगमा अनुकूल ॥१॥सर्वलोकमाता पृथ्वी, पिता तूंचि । वंदन तुजसी प्रेमें असो ॥२॥अरणींत अग्नि तेंवीं तुझें तेज । स्थापिलेंसी अद्य भूमीमाजी ॥३॥अनंत ब्रह्मांडें रोमरंध्रीं ज्याच्या । विक्रम हा त्याचा सहज क्रीडा ॥४॥देवा, हालवूनि अंग उदकासी । सिंचूनि आम्हांसी पुनित केलें ॥५॥अनंत अपार संपूर्ण त्वदगुण । शोधितां संभ्रम पावे बुद्धि ॥६॥त्वन्मायामोहित सकल हे जन । करावें कल्याण देवा, त्यांचें ॥७॥असो जळामाजी स्थापूनि अवनी । जाई निजधामीं परमेश्वर ॥८॥वासुदेव म्हणे तया ईश्वराची । लीला अगाधचि गावी नित्य ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP