स्कंध ३ रा - अध्याय २० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१०१
शौनक सूतासी, विदुर मैत्रेय- । संवाद, श्रद्धेय पुशिती प्रेमें ॥१॥
मैत्रेयासी क्षत्ता म्हणे सृष्ट्युत्पत्ति। केली कैशा रीति निवेदा तें ॥२॥
मरीच्यादिकांची मैथुनसृष्टि ती । मानसी तें कथीं पुण्यवंता ॥३॥
एकेकाची भिन्न अथवा संयुक्त । सृष्टि तेंही स्पष्ट निवेदावें ॥४॥
मुनि म्हणे जीवप्राक्तन, ईशेच्छा । काल तीन ऐशा कारणांनीं ॥५॥
प्रेरित प्रकृति महत्तत्त्वा जन्मे । सृष्टि यथाक्रमें पुढती होई ॥६॥
क्षुधार्त ब्रह्ययासी भक्षूं वधूं ऐसें । यक्ष-राक्षस जे म्हणती तेचि ॥७॥
वासुदेव म्हणे अविद्या अंधार । पुढती होती देव प्रकाशानें ॥८॥

१०२
कटिप्रदेशाच्या अग्रभागांतूनि । दैत्यांप्रति निर्मी पुढती ब्रह्मा ॥१॥
कामातुर दैत्य मैथुन ब्रह्मयासी । इच्छिती ब्रह्मा तैं देह त्यागी ॥२॥
तेचि सायंकाळदेवता जाहली । ललना भासली दैत्यां संध्या ॥३॥
पाहूनि तें ब्रह्मा हांसे तैं गंधर्व । अप्सरासमूह जन्म पावे ॥४॥
तदा तोही देह त्यागिला ब्रह्ययानें । आवडे चांदणें गंधर्वातें ॥५॥
आलस्य जांभई निद्रा उन्मादेंसी । होई भूतसृष्टि बहुविध ॥६॥
पितर किन्नर तत्तद्भावें होती । वासुदेव अंतीं म्हणे मनु ॥७॥

१०३
पाहूनि मनूसी देव-गंधर्वादि । आनंदित चित्तीं बहुत झाले ॥१॥
पुरुषशरीर देई तया ब्रह्मा । आचरिती कर्मा यज्ञादि ते ॥२॥
पुढती विरंची ध्यानसमाधीनें । निर्मी ऋषि जेणें सकला हर्ष ॥३॥
पूज्य ते सर्वांसी जाण वैराग्यानें । कृतार्थता ज्ञानें पावताती ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसा सृष्टिक्रम । विदुर ऐकून संतोषला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP