मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|निर्वाण प्रकरण| ६५५० ते ६५६१ निर्वाण प्रकरण ६४७९ ते ६४९५ ६४९६ ते ६५०८ ६५०९ ते ६५१७ ६५१८ ते ६५२९ ६५३० ते ६५४९ ६५५० ते ६५६१ ६५६२ ते ६५७० ६५७१ ते ६५८० ६५८१ ते ६६०० ६६०१ ते ६६०७ ६६०८ ते ६६३६ ६६३७ ते ६६४९ ६६५० ते ६६६३ निर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत निर्वा्ण प्रकरण - ६५५० ते ६५६१ Translation - भाषांतर N/Aये समयीं तुकारामाच्या दर्शनेंकरुन पुनीत होण्यास तीर्थे, व्रतें, पर्वकाळ इत्यादि मूर्तिमंत आलीं.॥६५५०॥पापताप दैन्य जाय उठाउठी । झालिया भेटी हरिदासांची ॥१॥ऐसें बळ नाहीं आणिकांच्या आंगीं । तपें तीर्थे जगी दानें व्रतें ॥२॥चरणींचें रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्याचे माथां ॥३॥भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेदी पाव हात कांहीं ॥४॥तुका ह्मणे मना झालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥५॥====नंतर इंद्रादि देवगण वगैरे दर्शनास आले. ॥६५५१॥संतांचें सुख झालें या देवा । ह्मणुनी सेवा करी त्यांची ॥१॥तेथें माजा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥२॥निर्गुण आकार झाला गुणवंत । घाली दंडवत पुजोनियां ॥३॥तिर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥४॥अष्टमा सिद्धिंचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोण्ही तया ॥५॥तुका ह्मणे तेव्हां बळिया शिरोमणी । राहिलों चरणीं निकट वासें ॥६॥॥६५५२॥नामाचिया बळें कैवल्य साधन । उगेची निधान हाता चढे ॥१॥जाणोनी हें वर्म भक्त भागवत । राहिलों निवांत प्रेमबोधें ॥२॥कोण जपतप वाहे हें काबाड । म्हणती आवघड यारे नाचों ॥३॥उघडा समाधी हरिकथा सोहळा । नरनारी बाळां लहान थोरां ॥४॥छंदें वाहती टाळी गाती नामावळी । जयजयकारें होळी दहन दोष ॥५॥येणें ब्रह्मानंदें दुमदुमिलें जग । सुलभ हा मार्ग सांपडला ॥६॥तुका ह्मणे हरिभक्तिचा उल्हास । आणिलासे त्रास यमदुतां ॥७॥॥६५५३॥शब्दांचीं रत्नें करुनी अलंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥भावाचे उपचारें करविलें भोजन । तेणें नारायण जेवविला ॥२॥संसारहातीं दिलें आचमन । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥३॥एक भाव दीप केला निरंजन । करोनी आसन देहाचिया ॥४॥रंगलीं इंद्रियें करोनी तांबुल । माथां तुळसदिळ समर्पिलें ॥५॥न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥६॥====याप्रमाणें एकादशीपर्यंत जागर केल्यानंतर द्वादशीस पारणें सोडण्यास तुकाराम बावांस संतांसह देवानें आपल्या उतार्यास अमंत्रण दिलें. ॥६५५४॥देवाच्या प्रसादें करावें भोजन । व्हाल कोण कोण भाग्याचे ते ॥१॥ब्रह्मादिकांसी हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रह्मरसीं शअवघिया पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥३॥इच्छादानी येथें बोलला समर्थ । अवघेचि आर्त पुरवितो ॥४॥सरे ऐसें येथें नाहीं कदा काळीं । पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसें ॥५॥तुका ह्मणे पाक लक्ष्मीच्या हातें । कामारी सांगातें निरुपम ॥६॥॥६५५५॥ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणें । बळिये आम्ही भले शरणांगत ॥१॥कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । झाला पद्मनाभ सेवा ऋणी ॥२॥बसलिये ठायीं लाविलें भरतें । त्रीपुटी वरुतें भेदी ऐसें ॥३॥कामधेनुचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाहीं वरुषावें ॥४॥हरि नाहीं आह्मां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसांवला ॥५॥तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहों ॥६॥====देवानें विचारिल्यावरुन तुकारामबावांनीं देवास संगातें जेवण्यास विनंति केली. ॥६५५६॥आवडी कां ठेऊं । बैसोनियां संगें जेवूं ॥१॥मागें नको ठेवूं उरी । माझी आण तुजवरी ॥२॥देखिले प्रकार । यात्रे पाहेन साचार ॥३॥तुका ह्मणे बळी । केली चाहाडी सकळीं ॥४॥====जैसें माता आवडीनें मुलास स्तनपान करिते तसें देव तुकोबांस प्रेमाने वोरसतात.॥६५५७॥अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दिनांचा ॥२॥आपुलिया वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥३॥तुका ह्मणे जेवी सवें । प्रेम घ्यावें प्रीतीचें ॥४॥॥६५५८॥मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥१॥भोगिलें तें आहे सुख । खातां मुख मोकळें ॥२॥उत्तम तें बाळासाठीं । लावी ओठीं माउली ॥३॥तुका ह्मणे झाली धणी । आनंद मनीं न समाये ॥४॥॥६५५९॥देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥तेच येताती ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥२॥वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥३॥तुका ह्मणे भुक । येणें नलगे आणीक ॥४॥॥६५६०॥धालों सुखें ढेंकर देऊं । उमटे जेऊं तोंवरी ॥१॥क्रीडा करुं निरंजनीं । न पुरे धणी हरीसवें ॥२॥अवघे खेळों अवघ्यामधीं । ठायीं न पडो ऐसी बुद्धि ॥३॥तुका ह्मणे वांचवितां । आह्मा सत्ता समर्थ ॥४॥॥६५६१॥आमुचें जीवन हें कथा अमृत । आणिकही संतसमागम ॥१॥सारुं एके ठायीं भोजन परवडी । स्वाद रसें गोडी पदोपदीं ॥२॥धालिया ढेंकर येती आनंदाचे । वोसंडलें वाचे प्रेमसुख ॥३॥पिललें स्वरुप आलिया घुमरी । रासी ते अंबरीं न समाये ॥४॥मोजितां तयाचा अंत नाहीं पार । खुंटला व्यापार तुकयाचा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : April 15, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP