मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|निर्वाण प्रकरण| ६४७९ ते ६४९५ निर्वाण प्रकरण ६४७९ ते ६४९५ ६४९६ ते ६५०८ ६५०९ ते ६५१७ ६५१८ ते ६५२९ ६५३० ते ६५४९ ६५५० ते ६५६१ ६५६२ ते ६५७० ६५७१ ते ६५८० ६५८१ ते ६६०० ६६०१ ते ६६०७ ६६०८ ते ६६३६ ६६३७ ते ६६४९ ६६५० ते ६६६३ निर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत निर्वान प्रकरण - ६४७९ ते ६४९५ Translation - भाषांतर आळंदीस एकादशीस किर्तनकाळीं काया ब्रह्म करण्याविषयीं संकल्प केला. ॥६४७९॥भक्तितें नमन वैराग्यतो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥१॥देहाच्या निरसणें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥२॥उदक अग्नि धान्यें झाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥३॥तुका ह्मणे मज कळते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥४॥====मग शंकाकारांस उत्तर दिलें. ॥६४८०॥वर्ण धर्म करिशी चोख । तरी तूं पावशी उत्तम लोक ॥१॥तुजला तें नाहीं ठावें । जेणें आंगें ब्रह्म व्हावें ॥२॥जरी तूं झालासी पंडित । करिसी शब्दांचें पांडित्य ॥३॥गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥४॥जाणसील तूं स्वतंत्र । आगमोक्त पुजा यंत्र ॥५॥करिसी साधनाच्या ओढी । जळो याच्या मोडामोडी ॥६॥तुका ह्मणे देही । संत झाले ते विदेही ॥७॥====पुन: शंकाकारास प्रत्युत्तर दिल्हें. ॥६४८१॥घोंटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं । मुक्तां आत्मस्थिति सांडविन ॥१॥ब्रह्मभूत होते कायाच किर्तनीं । भाग्यतरीं ऋणी देव ऐसा ॥२॥सांडविन तपोनिधां अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन ॥३॥तिर्थभ्रमकांसीं आणिन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥४॥भक्ति भाग्य प्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निज ठेवा ॥५॥धन्य म्हणविन इहलोकीं लोकां । भाग्यें आम्ही तुका देखियेला ॥६॥====लोहगांवच्या लोकांच्या प्रेमावरुन तुकोबांचा त्यांच्याकडे ओढा. ॥६४८२॥तृषाकाळें उदकभेटी । पडे मिठी आवडिची ॥१॥ऐसियांचा होकां संग । जिवलग संताचे ॥२॥मिष्टान्नाचा येक भुके । ह्मणतां चुके पुरे ऐसें ॥३॥तुका म्हणे कळवळा । माय बाळा मध्यें तो ॥४॥====लोहगांवीं किर्तन करीत असतां परचक्रानें गांव लुटून लोकांस त्रास दिला तो सहन झाला नाहीं ह्मणून आपणांस वैकुंठीं नेण्यास देवाचा धांवा केला ते अभंग॥६४८३॥न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दु:खी होतें ॥१॥काय तुह्मी येथें नसालसें झालें । आह्मीं न देखिलें पाहिजे हें ॥२॥परचक्र कोठें हरिदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥३॥तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें झालें ॥४॥॥६४८४॥काय म्यां मानावें हरिकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥२॥पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षीसी रोकडें साक्ष आलें ॥३॥तुका ह्मणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥४॥॥६४८५॥भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दु:खी होतां जना न देखवे ॥१॥आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुह्मी दातारा नेणां ऐसें ॥२॥भजनीं विक्षेप तेंची पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥३॥तुका ह्मणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥४॥॥६४८६॥बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझ्यागांठीं ॥१॥जाता आतां आज्ञा घेऊनिया स्वामी । काळक्षेप आम्ही करुं कोठें ॥२॥न घडे यावरी न धरवे धीर । पीडतां राष्ट्र देखोनि जग ॥३॥तुका म्हणे तुह्मी दिसे मोकलिलें । काय आतां आलें जिवित्वाचें ॥४॥॥६४८७॥शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणो पोटीं आहे ॥१॥तरीच नेद्याजी उत्तर । दु:खी राखिलें अंतर ॥२॥जावें वनांतरा । येणें उद्देशें दातारा ॥३॥तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥४॥॥६४८८॥येईल तुझ्या नामा । लाज म्हणून पुरुषोत्तमा ॥१॥धीर राहिलों धरुनी । त्रास उपजला मनीं ॥२॥जगा कथा नाव । निराशेनें नुपजे भाव ॥३॥तुम्ही साक्षी कीं गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥४॥॥६४८९॥नेणें जपतप अनुष्ठान याग । काळें जव लाग घेतलासे ॥१॥रिघालों या भेणें देवाचे पाठिसीं । लागे त्याचे त्यासी सांभाळावें ॥२॥मापे माप सळे चालिली चढती । झाली मग राती काय चाले ॥३॥तुका ह्मणे चोरां हातीं जे वांचले । लाभावारीं आलें वरी लेखूं ॥४॥॥६४९०॥कळों आलें ऐसें आतां । नाहीं तुम्हां संतांसीं ॥१॥तरी विर्ये नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥२॥आड ऐसें येतें पाप । वाढे ताप आगळा ॥३॥तुका ह्मणे झाला । हा विठ्ठल हिणशक्ति ॥४॥॥६४९१॥लागों दिल्हें आंग । ऐसें कां गा सन्निध ॥१॥कोण्या पापें उदो केला । तों देखिला प्रळय ॥२॥न देखवे पीडिला सर्प । जया दर्प विषाचा ॥३॥तुका ह्मणे भलें । मज तों नवजे साहीलें ॥४॥॥६४९२॥धांवा शिघ्रवत । किंवा घ्यावे दंडवत ॥१॥तुमचा जातो बडिवार । आह्मी तों हीणवर ॥२॥न धरवे धिर । धांवा नका चालों स्थिर ॥३॥तुका म्हणे वाणी । माझी लाजिली जी गुणी ॥४॥॥६४९३॥सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामि जाणे ॥१॥मनाचिये मुळीं सहावें बैसोन । अकशावे गुण पायांपासीं ॥२॥भेटीचे तातडी करितसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥३॥तुका म्हणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रिद साचें ॥४॥॥६४९४॥उद्वेगासी बहू फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥आतां कोण यासि करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥२॥मज तो अत्यंत दरुषणाचि आस । झाला तरी हो नाश जीवित्वाचा ॥३॥तुका म्हणे आहे वचनाचि उरी । करितों तोंवरी विज्ञापना ॥४॥॥६४९५॥नये नेत्री जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥२॥न फळे उत्तर । नाहीं स्वामि जों सादर ॥३॥तुका म्हणे भेटी । जवें नाहीं दृष्ट दृष्टीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 15, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP