कार्तिक वद्य १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


‘वनस्पतींचे वाचस्पति’ जगदीशचंद्र !

शके १७८० च्या कार्तिक व. १० रोजीं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला. विक्रमपूर जिल्ह्यांतील राणीखल या गांवी यांचा जन्म झाला आणि कलकत्त्याच्या सेंटा झेवियर काँलेजांत यांचे शिक्षण पूर्ण झालें. पुढें लंडन येथें ख्राइस्ट चर्च काँलेजातून अभ्यास करुन विज्ञान, रसायन व वनस्पतिशास्त्र या विषयांची पदवी मिळवून ते हिदुस्थानांत आले, आणि कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी काँलेजमध्यें प्राध्यापकाचें काम पाहूं लागले. उत्तरायुष्यांत वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून यांचा लौकिक वाढला; तरी सुरुवातीस त्यांनीं इलेक्ट्रिसिटीतील संशोधन केलें. त्यानंतर ते वनस्पतिशास्त्राकडे वळले. रेडियोमधील ध्वनिवाहक भांड्यांना सुद्धां दीर्घकाल वापरल्यानंतर शीण येतो; व थोड्या विश्रांतीनंतर् तो जातो हें ध्यानांत आल्याबरोबर यांनीं प्राणी व अचेतन यांच्या अभ्यासास सुरुवात केली. त्यांची वृत्ति पहिल्यापासूनच जडांतून चित्‍ पाहाण्याची असल्यामुळें त्यांना वनस्पतीचें ‘जीवन’ लौकरच समजून आलें. रुधिराभिसरण, स्नायु, मज्जातंतु इत्यादि क्रिया यांनी शोधून काढल्या. इंग्लंडमधील राँयल इन्सिट्यूटपुढें दिलेल्या भाषणांत यांनीं सांगितलें, " अणुरेणूपासून सूर्यमालेपर्यंत मला एकच तत्त्व भरलेलें दिसतें व ती हजार वर्षापूर्वी गंगातटाकीं निवास करणार्‍या माझ्या पूर्वजांनीं उपनिषदांतून दिलेल्या एकात्वाच्या संदेशाचींच अल्पस्वल्प प्रचीति मला येत आहे." बिनतारी संदेशाचा शोध मार्कोनीनें लावला व त्यानेंच रेडियोचा चमत्कार जगास दाखविला असें मान्य असलें तरी त्याच्या आधीं हा शोध जगदीशचंद्रानीच लाविला होता. तरी पण ‘वनस्पतींचे वाचस्पति’ म्हणून जगानें यांना "भारताच्या गौरवार्थ" ही काव्यपंक्ति त्यांच्या संस्थेवर आहे व तिच्या शिरोभागीं दधीच्या ऋषींच्या हाडांचे वज्र कोरुन त्याग करण्याचा संदेश भारताला जगदीशचंद्र देत आहेत. आपल्या अमरत्वाची खूणगांठ त्यांनीं या शब्दांत सांगितली आहे,
--  ३० नोव्हेंबर १८५८

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP