कार्तिक शुद्ध ११
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
यशवंतराव होळकरांचें निधन !
शके १७३३ च्या कार्तिक शु. ११ रोजीं इंग्रजांना मोठ्या शौर्यानें सामना देणारे मराठेशाहींतील प्रसिद्ध वीर यशवंतराव होळकर यांचे निधन झालें. मराठेशाहीच्या पडत्या काळांत इंगजांशी ज्या ज्या वीरांनी मोठ्या शौर्यानें लढाया दिल्या, त्या शूर वीरांत यशवंतराव होळकरांची योग्यता मोठी आहे. दौलतराव शिंदे व बाजीराव पेशवे यांनी होळकरांची योग्यता मोठी आहे. दौलतराव शिंदे व बाजीराव पेशवे यांनी होळकरांची दौलत बुडविली होती, ती प्रचंड लढाया जिंकून यशवंतरावानें परत मिळविली. या दोघांप्रमाणें यशवंतराव इंग्रजांपुढें नमला नाहीं, तर त्याच्याशीं निधडया छातीनें युद्ध करुन माँन्सनसारख्या सेनापतीवरहि यांनी मात केली. उत्कृष्ट सेनापति म्हणून यांचें नांव मराठ्यांच्या इतिहासांत कायम राहील. मराठ्यांच्या लढाऊ वृत्तीचें दिव्य सामर्थ्य सर्व जगाला पुन्हा एकदां यांनींच दाखविलें. थाँर्ननें प्रत्यक्ष पाहून यांचें वर्णन केलें आहे, "यशवंतराव सुस्वरुप व तरतरीत होता. एक डोळा गेल्यानें थोडें वैगुण्य आलें तरी चेहरा प्रसन्न व प्रफुल्ल दिसे. बोलण्याचालण्यांत तो इतका उदार व कनवाळू असे कीं, त्याच्या हातून अत्यंत क्रूर कृत्ये घडलीं असें मनांत सुद्धां येणार नाहीं. तो केव्हां हिरेमोत्यांचे बहुमोल अलंकार व भपकेदार पोशाख चढवून मुद्दाम आपलें वैभव प्रगट करी, तर अन्य क्षणीं नुसती टिचभर लंगोटी लावून उघड्या पाठीच्या घोड्यावरुन दौड करी. " यशवंतराव होळकरांच्यासंबंधी डफ लिहितो, " मराठी व फारसी लेखन त्यास करतां येत असे. त्याचा बांधा ठेंगू, पण हाडापेरानें मजबूत व काटक असा होता. रंग काळा असून चेहर्यावर शौर्य, धाडस व लहर यांची इच्छा पूर्ण झाली नाहीं. शत्रूवर मात करण्यासाठीं तोफा ओतण्याचें काम हे स्वत: करीत असत. शेवटपर्यंत यांच्या सामर्थ्याचा दरारा एवढा होता कीं, त्यांच्या वाटे जाण्याचें साहस कोणींहि केलें नाहीं. आयुष्याच्या शेवटीं यशवंतरावांना चित्तभ्रम झाला. शेवटीं यांनी महिपतबाबा गोसावी ढालीबाबा यांचा उपदेश घेतला. आणि भानापूर येथें कार्तिक शु. ११ रोजीं यांचा अंत झाला.
- २८ आँक्टोबर १८११
--------------------------
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP