वधू वरापेक्षा लहान असावी
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
‘ लहान ’ या अर्थी मूळ याज्ञवल्क्यवचनात “ यवीयसी ” हे विशेषण योजिले आहे; त्याचा व्याकरणाच्या आणि कोषाच्या दृष्टीने “ वरापेक्षा वयाने लहान ” हाच काय तो खरा अर्थ आहे, तो निबंधकारांनी कायम ठेविला असून, शिवाय “ वरापेक्षा शरीराने लहान ” असाही आणखी एक जास्ती अर्थ लिहिला आहे. विवाह्य कन्येच्या गुणदोषवर्णनात ती अंगाने अतिस्थूल नसावी असे सांगितले आहे, त्याच्याशी मेळ घालून या शब्दार्थाचा विचार करू गेल्यास तो केवळच अप्रासंगिक म्हणता यावयाचा नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP